IND Vs ENG Match Live Streaming Where To Watch India Vs England Cricket World Cup 2023 Live Telecast

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs ENG, World Cup : गतविजेता इंग्लंड विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखणार की, त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येणार याचा फैसला उद्या होणाराय. योगायोगाची बाब म्हणजे विश्वचषकातल्या या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडची गाठ रोहित शर्माच्या भारतीय संघाशी पडणार आहे. या दोन संघांमधला विरोधाभास म्हणजे विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड शेवटून दुसऱ्या म्हणजे नवव्या स्थानावर आहे. भारतानं आतापर्यंत पाचपैकी पाचही सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला पाचपैकी बांगलादेशविरुद्धचा केवळ एकमेव सामना जिंकता आला आहे. त्यामुळं भारताला हरवून विश्वचषकातलं आपलं आव्हान टिकवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न राहिल. तर रोहित शर्माचा भारतीय संघ इंग्लंडला हरवून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याचा नेटानं प्रयत्न करेल. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा सामना लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होईल. टिव्हीवर  स्टार स्पोर्ट्स चॅनलवर सामना पाहता येईल.  स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी सह इतर भाषांमध्येही सामन्याचा आनंद घेता येईल. 

कधी होणार सामना – 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना लखनौच्या इकाना स्टेडिअममध्ये रविवारी 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल. 

फुकटात कुठे पाहाल सामना ?

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये होणारा शानदार सामना मोबईलवरही लाईव्ह पाहता येईल.  डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर हा सामना मोफत पाहता येईल. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन चार्ज लागणार नाही. फ्रीमध्ये या सामन्याचा आनंद घेता येईल. त्याशिवाय एबीपी माझाच्या संकेतस्थळावर सामन्यासंदर्भात सर्व माहिती वाचता येईल. 

मोबाइलवर कुठे पाहाल सामना ?

डिज्नी प्लस हॉटस्टार विश्वचषकाचे सर्व सामने मोफत पाहता येतील. मोबाइलवर सामना पाहण्यासाठी फक्त तुम्हाला हॉटस्टार अॅप डाउनलोड करावे लागेल. 

रेडियोवर कुठे ऐकाल लाईव्ह कॉमेंट्री ?

विश्वचषकातील सामन्याचे लाई्ह कॉमेंट्री अथवा समालोचन ऐकायचं असेल तर तुम्हाला ऑल इंडिया रेडियोच्या डिजिटल चॅनल – इंडिया: प्रसार भारतीवर जावे लागेल. त्याशिवाय आयसीसीच्या ऑफिशियल डिजिटल ऑडियो पार्टनर डिजिटल 2 स्पोर्ट्स (Digital 2 Sports) वरही समालोचन ऐकू शकता. 

विश्वचषकाच्या बातम्या कुठे वाचाल – 

विश्वचषकाच्या बातम्या अथवा स्कोअरकार्ड पाहण्यासाठी तुम्हाला आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा एबीपी माझाच्या https://marathi.abplive.com/ संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.  

[ad_2]

Related posts