Production Of Sitafal Has Decreased Drastically Due To The Drought Conditions Market Prices Increased Nandurbar Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nandurbar Agriculture News : नंदूरबार : नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील सिताफळांना (Sitaphal) रानमेवा म्हणूनही ओळखलं जातं. राज्यभरात आणि गुजरात राज्यात या सातपुड्यातील सीताफळांची मोठी मागणी असते. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती आणि कमी झालेला पाऊस यामुळे सीताफळांच्या उत्पादनात प्रचंड घट आली आहे आवक कमी असल्यानं सिताफळांना (Custard Apple) चांगला दर मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात सीताफळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असला तरी उत्पादन कमी असल्यानं ‘कमी खुशी, कभी गम’ अशी परिस्थिती आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात तसेच सीमावर्ती भागातील गुजरातच्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील सिताफळांना राज्यभरात आणि गुजरात (Gujarat News) राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते. नंदुरबार जिल्ह्यातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात सिताफळांची झाडं आढळून येतात, यातून आदिवासी बांधवांना रोजगार मिळत असतो. मात्र यावर्षी जिल्ह्यात झालेला समाधानकारक पाऊस (Maharashtra Rain Updates) आणि दुष्काळी परिस्थिती (Drought Conditions) यामुळे सिताफळाच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याचं दिसून येत आहे. सिताफळ विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होत आहेत. मात्र ग्राहकांना सीताफळांना जादा दर देऊन खरेदी करावा लागत आहे.

बाजारात सीताफळांना मोठी मागणी असली तरी उत्पादन कमी झाल्यानं बाजारपेठांमध्ये आवक कमी आहे. आवक कमी असल्यानं सिताफळांना चांगला दर मिळत आहे. उत्पादन कमी आल्यानं शेतकऱ्यांना दर मिळत असला तरी त्याचा उपयोग काय? असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत. बाजारपेठांमध्ये सिताफळांना शेतकऱ्यांना 50 रुपयांपासून तर 70 रुपये किलोपर्यंत फळाच्या आकारावर दर मिळतो. हे दर अजून वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कधी नाही तो सिताफळांचा दर 70 रुपये किलोपर्यंत गेल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान असलं, तरी दुष्काळी परिस्थितीमध्ये उत्पादनात घट आल्यानं डोंगराळ भागातील आदिवासी बांधवांचं प्रमुख उत्पादनाचं साधन असलेल्या सिताफळांच्या बाबतीतही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 

[ad_2]

Related posts