केरळमध्ये मोठास स्फोट, एकाचा मृत्यू, 20 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भिती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Blast In Kerala: केरळमध्ये (Keral News) एका ख्रिश्चन मेळाव्यात मोठा स्फोट (Kerala Blast) झाला आहे. स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार, राज्याच्या एर्नाकुलममधील कलामासेरी येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एका सभेदरम्यान मोठा स्फोट झाला. या स्फोटात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दरम्यान, दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे. 

स्फोटांचा तपास NIA करणार 

केरळमधील साखळी बॉम्बस्फोटांचा तपास एनआयए (NIA) करणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए लवकरच घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात करणार आहे. एनआयएची फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचणार आहे. साखळी स्फोटांचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

केरळमधील स्फोटाबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री विजयन यांच्याशी फोनवर बोलून सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. गृहमंत्र्यांनी एनआयएला घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

घटनास्थळी बचावकार्य सुरू 

सध्या केरळ पोलिसांकडून या स्फोटाबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही, मात्र एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, सकाळी 9 वाजता स्फोट झाल्यानंतर पोलिसांना मदतीसाठी फोन येऊ लागले. तात्काळ पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि स्थानिक लोकांसह मदत आणि बचावकार्य सुरू केलं. स्फोटानंतर शेकडो लोक पोलिसांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये स्फोटानंतर भयावह दृश्य दिसत आहे. 

एकापाठोपाठ 3 ते 4 ब्लास्ट 

कन्व्हेन्शन सेंटरमधील तीन दिवसीय कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. स्फोट झाला तेव्हा सभागृहात दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. एकापाठोपाठ एक 3 ते 4 स्फोट झाले, ज्यात अनेक लोक जखमी झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

गृहमंत्री अमित शाहांनी घेतला परिस्थितीचा आढावा 

या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी या स्फोटाबाबत सर्व माहिती जाणून घेतली असल्याचं सुत्रांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना परिस्थितीची माहिती दिली आहे आणि जखमींना शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश अमित शहांनी दिले आहेत. 

केरळचे मंत्री काय म्हणाले?

केरळचे उद्योगमंत्री आणि कलामासरीचे आमदार पी. राजीव यांनी या घटनेबाबत सांगितलं की, अधिकाऱ्यांना शक्य ती सर्व मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले, मी सर्व अधिकाऱ्यांशी बोललो आहे. सर्व सूचना जारी केल्या आहेत. स्फोटाच्या कारणाबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तपास सुरू करण्यात आलेला आहे. सध्या घटनास्थळी कोणालाही जाण्याची परवानगी नाही.



[ad_2]

Related posts