Bachu Kadu Was Stopped In Ayodhya Denied Permission For Meeting Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अयोध्या: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी श्रीरामाला साकडे घालण्यासाठी गेलेल्या आमदार बच्चू कडूंचा (Bachchu Kadu) ताफा पोलिसांनी अडवला आणि त्यांच्या सभेला परवानगी दिली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी चौकातच छोटेखानी भाषण केलं. आमदार बच्चू कडू यांच्यासोबत 100 च्या वरती गाड्यांचा ताफा अयोध्यामध्ये गेला होता. पोलिसांनी फक्त पाच वाहनं घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

आमदार बच्चू कडू यांच्या अयोध्या येथे होणाऱ्या जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे अयोध्या येथील लता मंगेशकर चौकात बच्चू कडू यांनी माईकवर छोटेखानी भाषण केलं. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी आलो तरीही आम्हाला थांबवलं हे दुर्देव असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. आमदार बच्चू कडू  आजपासून दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत तर आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाले. 

काय म्हणाले बच्चू कडू?

स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले, ज्यांनी रक्त आणि पाणी एक केलं ते शेतकरी सुखी नाही. बिसलरीला भाव आहे पण येथील शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही. ही लढाई लहान असली तरी धर्म, जात बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी लढा सुरू केला आहे. या ठिकाणी हिंदू, मुसलमान देखील शाहिद झाले आहेत. शेतकऱ्यांना अर्थिक आरक्षण मिळालं पाहिजे. उत्तरप्रदेशचे जेव्हा बजेट जाहीर होते तेव्हा शेतकऱ्यांसाठी किती बजेट राहते. देशासाठी सगळ्यांनी आपलं रक्त दिलं आहे. ज्या प्रमाणे मंदिराचे निर्माण होत आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या घराची निर्मिती झाली पाहिजे. 75 वर्षात शेतकऱ्यांचं घर होत नसेल होत तर कशाचं राजकारण आहे? गर्वसे कहो हम किसान है. शेतकरी शेतमजूर यांच्या भल्यासाठी मी आयोध्याला आलो आहे. 

प्रभू रामचंद्रला कापूस, तूर, सोयाबीन, ऊस आणि धानचा प्रसाद

देशात 65 टक्के शेतकरी आणि शेतमजूर आहे. तर देशाच्या आणि राज्याच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना व्यवस्थित हिस्सा मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक समाज आरक्षणासाठी आक्रमक होत आहे. त्यात जातीत तेढ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळावं अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. यासाठी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन बच्चू कडू दर्शन घेऊन प्रभू रामचंद्रला कापूस, तूर, सोयाबीन, ऊस आणि धानचा प्रसाद चढवणार आहे.

लखनौ विमानतळावर बच्चू कडू यांचे जोरदार स्वागत

दरम्यान लखनौ विमानतळावर बच्चू कडू यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय किसान क्रांती दलाच्या वतीने अमरेश मिश्रा यांच्या वतीने बच्चू कडू यांच स्वागत करण्यात आले. आज  बच्चू कडू यांची अयोध्येत जाहीर सभा होणार आहे तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बच्चू कडू काय बोलणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts