[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Bank Holidays In November : नोव्हेंबर (November) महिना सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. तुम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये बँकांसंबंधित काही कामे करणार असाल, तरी ही बातमी तुमच्यासाठी आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये अर्धा महिना बँका बंद राहणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात एक किंवा दोन नाही तर 15 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे बँकांची काम करण्याआधी बँकाँच्या सुट्टीचं वेळापत्रक (Bank Holiday List) एकदा पाहून घ्या.
नोव्हेंबर महिन्यामध्ये 15 दिवस बँकाना सुट्टी
नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीसह इतरही अनेक सण उत्सव असल्याने बँकांना सुट्टी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटनुसार, नोव्हेंबर 2023 मध्ये बँकांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण नऊ सुट्ट्या आहेत. त्यासोबत दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणारी सुट्टी आणि रविवारची सुट्टी यांचा समावेश केल्यास नोव्हेंबर महिन्यात 15 दिवस सुट्ट्या आहेत.
Bank Holiday List In November : नोव्हेंबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी
- 1 नोव्हेंबर : हा दिवस कन्नड राज्योत्सव आणि करवा चौथ आहे. या दिवशी कर्नाटक, मणिपूर आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.
- 5 नोव्हेंबर : हा दिवस रविवार आहे.
- 10 नोव्हेंबर : मेघालयमध्ये या दिवशी वंगाळा सणानिमित्त बँका बंद राहतील.
- 11 नोव्हेंबर : हा दिवस महिन्याचा दुसरा शनिवार आहे.
- 12 नोव्हेंबर : या दिवशी रविवार आहे आणि दिवाळीही आहे.
- 13 नोव्हेंबर : या दिवशी दिवाळी आणि गोवर्धन पूजा असल्याने त्यानिमित्त सुट्टी असेल. त्रिपुरा, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात बँका बंद राहतील.
- 14 नोव्हेंबर : या दिवशी बली प्रतिपदा आहे. या दिवशी गुजरात, कर्नाटक, सिक्कीम आणि महाराष्ट्रात बँक सुट्टी असते.
- 15 नोव्हेंबर : या दिवशी भाऊबीज आहे. चित्रगुप्त जयंतीमुळे सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये या दिवशी बँकांना सुट्टी असेल.
- 19 नोव्हेंबर : रविवारची सुट्टी
- 20 नोव्हेंबर : छठ पूजा असल्याने बिहारसह राजस्थानमध्ये बँकांना सुट्टी असेल.
- 23 नोव्हेंबर : सेंग कुत्स्नेम आणि इगास बागवाल यांचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये सुट्टी असेल.
- 25 नोव्हेंबर : या दिवशी चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
- 26 नोव्हेंबर : रविवारची सुट्टी
- 27 नोव्हेंबर : गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे. त्रिपुरा, मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, नवी दिल्ली, बिहार, झारखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये या दिवशी सुट्टी असेल.
- 30 नोव्हेंबर : कनकदास जयंती. कर्नाटकात या दिवशी बँका बंद राहणार आहेत.
[ad_2]