Maratha Reservation Manoj Jarange Will Drink Water From Today Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या सात दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावत आहे.  मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे जरांगे आजपासून पाणी पिणार आहे.  मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)   राज्यभरात  मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे.  मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्यात.  उग्र आंदोलन होत असल्याने आंदोलकांच्या आग्रहाने ते पाणी घेणार आहे. पाणी घेत नसल्याने तब्येत खालावत असल्याने आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगे पत्रकार परिषद (Manoj Jarange Press Conference) 

मनोज जरांगेंच्या आवाहनानंतरही राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे  पत्रकार परिषद घेणार आहेत.  जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी फोनवरुन चर्चा केल्यानंतर थोड्याच वेळात माध्यमांशी बोलण्याचा निर्णय जरांगेनी घेतल आहे.  जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.  मनोज जरांगे पाटील त्यासंदर्भात पत्रकार परिषदेत तपशील देणार आहेत. 

आंदोलन चिघळू नये यासाठी पाणी पिण्याचा निर्णय

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना समोर येत आहे. यात अनेक राजकीय नेत्यांची घरं आणि कार्यालय पेटवून देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून विशेष सूचना देण्यात आल्या आहे. यापुढे होणाऱ्या हिसंक आंदोलनात बघ्याची भूमिका घेऊ नका, तोडफोड आणि नुकसान होत असल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना (Police) देण्यात आले आहे. आंदोलन चिघळू नये यासाठी जरांगे यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे. 

जरांगेंच्या आवाहनानंतरही राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन

मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतरही राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन सुरू आहे. बीडमध्ये काल झालेल्या आंदोलनानंतर  जमावाने बीड बस स्थानकातील एक ही एसटी फोडायची शिल्लक ठेवली नाही. सोमवारी जमावाने आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावल्यानंतर हा जमाव बस स्टॅन्डमध्ये आला.  यावेळी बस स्टँडमध्ये 70 पेक्षा जास्त एसटी उभ्या  होत्या. या सर्व एसटी जमावाने फोडल्या. सत्ताधारी जाळपोळ करत असल्याचा जरांगेंना संशय आहे.  त्यामुळे सध्याच्या हिंसक आंदोलनात मराठा समाजातील बांधवाचा बळी जाऊ नये यासाठी देखील जरांगेंनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे. 

हे वाचा :

मराठा आंदोलनाचा गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांना अटक करा; पोलीस महासंचालकांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

[ad_2]

Related posts