‘मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत’, थरथरत्या अंगाने जरांगेंनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा सांगितली!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जालना :  मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Press Confernce)  यांनी आज सकाळी (31 ऑक्टोबर)  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी आज सकाळी फोनवरून संवाद साधला.  त्यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अर्धा तास झालेल्या चर्चात कुणब प्रमाणपत्र, विशेष अधिवेशन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.  मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत  नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे मनोज जरांगेनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. जालन्यातील आंदोलनस्थळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरक्षणाबाबत चर्चा झाली. मनोज जरांगे म्हणाले,  आपण त्यांना स्पष्टपणे सांगितले, नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही.आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा 2004 चा GR दुरुस्त करा. शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 60 -65 टक्के मराठा समाज अगोदरच obc मध्ये आहे, आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या. ज्याचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत.

[ad_2]

Related posts