Maratha Reservation Protest Shiv Sena Uddhav Thackeray Gut Will Meet President Droupadi Murmu For Sansad Special Session Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  मुख्यमंत्र्यांनी मन की बात ऐकली आता मराठा आरक्षणावर (Maratha Reservation)  जन की बात ऐकावी असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुनावलं. त्यानंतर  मराठा आणि धनगर आरक्षणा संदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याच्या  मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Murmu) यांची भेट मागितली आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाने एक पत्र राष्ट्रपतींना लिहिले आहे.

मराठा आणि धनगर आरक्षणा संदर्भात  विशेष अधिवेशन बोलवण्याच्या  मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट मागितली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे  खासदार विनायक राऊत यांनी  राष्ट्रपतींना पत्र लिहून  पाच किंवा सहा नोव्हेंबरला  भेटीची वेळ मागितली आहे. संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, अजय चौधरी, सुनील प्रभू  हे शिवसेना उद्धव ठकरे गटाचे नेते भेटीसाठी जाणार आहेत.  

 मराठा आरक्षणावर अजून मार्ग निघालेला नाही. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना देखील भेटण्याची तयारी आहे. पंतप्रधानांचे कर्तव्य आहे की राज्यात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आरक्षणावर सरकारने स्वतःचे कपडे झटकू नयेत, आमचं सरकार येण्याआधीच सुप्रीम कोर्टात केस गेली होती, त्यामुळे आम्ही बाजू मांडली नाही असं म्हणणं चूक आहे असं त्यांनी सुनावलं. तसंच आमच्या सरकारमध्ये सध्याचे मुख्यमंत्रीही होते याची आठवण त्यांनी करून दिली. केंद्राच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा अशी मागणी त्यांनी केली. पंतप्रधान मोदींनी ऐकलं नाही तर सर्व 48 खासदारांनी राजीनामा द्यावा असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. 

 मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीला ऐऱ्या गैऱ्यांना पक्षांना निमंत्रण दिलं

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)  विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाची दाहकता कमी करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. शरद पवार, अशोक चव्हाण, अंबादास दानवे, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वपक्षीय नेते हजर राहणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना या बैठकीसाठी बोलवण्यात आले नाही. यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यावर  जोरदार निशाणा साधला आहे.  मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीला ऐऱ्या गैऱ्यांना पक्षांना निमंत्रण दिलं. मात्र उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)  बोलवण्यात आलं नाही. त्यावरुन संकोचीत मनोवृत्ती दिसते, अशी टीका संजय राऊतांनी (Sanjay Raut)  केली आहे. 

[ad_2]

Related posts