Maharashtra Politicis BJP Leader Minister Sudhir Mungantiwar Majha Katta Abp Majha In Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sudhir Mungantiwar Majha katta : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबद्दल विरोधकांनी शंक उपस्थित केल्यानं मला फार दुख: झाल्याचे मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. तुम्ही राजकीय मुद्यांबद्दल बोलाला असता तर चाललं असतं. पण वाघनखांबद्दल कशाला शंका उपस्थित करता असे मुनगंटीवार म्हणाले. काही जण म्हणाले की फक्त तीन वर्षांसाठीच वाघनखे कशाला आणले, याबाबत मला भेटा मी पुढचा प्लॅन सांगतो असे मुनगंटीवार म्हणाले. वाघनखे आम्ही आणले आहेत, याचे तुमच्याकडून कौतुक होत नसले करु नका असे म्हणत मुनगंटीवारांनी विरोधकांवर कडाडून प्रहार केला.   

वाघनखं हा निवडणुकीचा किंवा राजकारणाचा विषय असू शकत नाही

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं हा निवडणुकीचा किंवा राजकारणाचा विषय असू शकत नाही. जर एखाद्याच्या मनात वाघनखांबाबत संशय होता तर भेटून सांगता आलं असतं असे मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील साऱ्या शिवभक्तांसाठी आस्था आणि अस्मिता असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. 
 
विरोधकांकडून मीठ कालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाघनखांच्या बाबतीतला मुद्दा हा एक राज्य आणि एक देश यांच्यामधील आहे. यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. आपल्या संविधानामध्ये या परवानगीच्या संदर्भात सांगितल्याचे मुनगंटीवार म्हणाले. पहिला सांस्कृतिक विभाग कोणी घेत नाही म्हणून दिलं जायचं. शेवटच्या तीनमध्ये हा विभाग असायचा. आता त्यामध्ये बदल करण्याचा मी प्रयत्न करायचे असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार सकारात्मक

सरकारी निर्णय हा संविधानाच्या चौकटीत राहूनच घ्यावा लागेल असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत सकारात्मक आहेत. कुठेही जर तर असे नाही. आरक्षण द्यायचे म्हणजे द्यायचेच या मुद्यावर ठाम असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Majha katta : मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचं स्वागत, मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार

[ad_2]

Related posts