IND Vs SL World Cup 2023 India Vs Sri Lanka Head-to-head Mumbai Wankhede Stadium

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs SL head-to-head : विश्वचषकाच्या रणांगणात रोहित शर्माच्या भारतीय संघाचा (Team India) सामना आज श्रीलंकेशी होतोय. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede stadium) खेळवण्यात येत आहे. भारतानं विश्वचषकाच्या (World Cup 2023) मोहिमेत आतापर्यंत सहापैकी सहाही सामने जिंकले आहेत. त्यामुळं विश्वचषकाच्या गुणतालिकेत (2023 World Cup Points table) सर्वाधिक 12 गुणांसह भारत अव्वल स्थानी आहे. पण सातव्या स्थानावरच्या श्रीलंकेला सहापैकी केवळ दोनच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. त्यामुळं विश्वचषकातलं आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेला बलाढ्य भारतीय संघावर विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यासाठी श्रीलंकेची भिस्त हील प्रामुख्यानं सदीरा समराविक्रमा, पाथुम निसांका आणि कुशल मेंडिस या तीन फलंदाजांवर राहिल. त्या तिघांनीही विश्वचषकात धावांचा रतीब घातला आहे. तसंच दिलशान मधुशंका आणि कासून रजिथा या वेगवान गोलंदाजांचं आक्रमण यशस्वी ठरताना दिसत आहे. दोन्ही संघातील लढत काट्याची होईल, असाच अंदाज आहे. पाहूयात दोन्ही संघाची हेड टू हेड स्थिती.. 

IND vs SL, World Cup 2023 : India vs Sri Lanka head-to-head

भारत आणि श्रीलंका संघामध्ये आतापर्यंत 167 एकदिवसीय सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाचे वर्चस्व आहेत. भारताने तब्बल 98 एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव केलाय. तर 57 सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला आहे. एक सामना बरोबरीत सुटला होता.  जानेवारी 1979 मध्ये दोन्ही संघामध्ये पहिला एकदिवसीय सामना झाला होता. 

 India vs Sri Lanka Head to Head in ODI World Cup

विश्वचषकाच्या मैदानात भारत आणि श्रीलंका संघामध्ये नऊ वेळा आमनासामना झालाय. दोन्ही संघाने प्रत्येकी चार चार सामन्यात विजयस मिळवला आहे. एक सामना रद्द झाला होता. 2011 आणि 2019 मध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव केलाय. तर 2007 मध्ये श्रीलंकेने बाजी मारली होती.  1979 मध्ये विश्वचषकात पहिल्यांदा दोन्ही संघ आमने सामने आले होते, त्यामध्ये श्रीलंकेने बाजी मारली होती. 1992 मध्ये सामना रद्द झाला होता. 1996 मध्ये विश्वचषकात भारत आणि श्रीलंका दोनवेळा आमने सामने आले होते. यामध्ये श्रीलंकेने  विजय मिळवला होता. 1999 मध्ये भारताने पहिल्यांदा श्रीलंकेचा पराभव केला.   

India vs Sri Lanka Head to Head in Wankhede Stadium

 वानखेडे स्टेडियमवरील रेकॉर्ड काय 

वानखेडे स्टेडिअमवर दोन्ही संघामध्ये तीन सामने झालेत. यामध्ये भारताने दोन सामन्यात विजय मिळवलाय. श्रीलंकेविरोधात भारताची सर्वोच्च धावसंख्या 299 आहे.. तर निचांकी धावसंख्या 225 इतकी आहे. श्रीलंकेची वानखेडेवरील सर्वोच्च धावसंख्या 289 तर निचांकी धावसंख्या 274 इतकी आहे. 

वानखेडेचा रेकॉर्ड काय ?

वानखेडे स्टेडिअवर आतापर्यंत 25 वनडे सामने झाले आहेत.यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 13 सामने जिंकलेत. येथील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 256 इतकी आहे. तर निचांकी धावसंख्या 115 आहे. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 438 आहे. येथे 284 धावांचा यशस्वी पाठलाग केलाय. 

X-Factors for India vs Sri Lanka 

भारताचा एक्स फॅक्टर काय ?

विराट कोहली हा टीम इंडियासाठी आजच्या सामन्यात एक्स फॅक्टर आहे. विराट कोहलीने श्रीलंकेविरोधात खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीने 50 डावात 2506 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. 

लंकेसाठी एक्सफॅक्टर कोण ?

पथुन निसंका श्रीलंकेसाठी एक्सफॅक्टर ठरु शकतो. मागील सहा डावात त्याने 298 धावा केल्या आहेत. यंदाच्या विश्वचषकात त्याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. भारताविरोधातही तो मोठी धावसंख्या उभारु शकतो.

IND vs SL, World Cup 2023: Pitch report 

वानखेडेची खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाजांना मदत करणारी आहे. मागील 20 वनडेचा विचार केल्यास पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 258 इतकी आहे. नाणेफेक जिंकणारा संघ या मैदानावर प्रथम फलंदाजी करेल. 

IND vs SL, World Cup 2023: Weather update 

मुंबईमध्ये आज पावसाची शक्यता थोडीही नाही. हवामान एकदम क्लिअर असेल. त्यामुळे सामन्यात पावसाचा कोणताही व्यत्यय येणार आहे. तापमान 29 डिग्रीच्या आसपास असेल. 
 
श्रीलंकाविरोधात भारताची संभावित प्लेइंग इलेवन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव,  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

[ad_2]

Related posts