daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 2 November 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 2 November 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी सर्व अडचणींवर मात कराल. कोणताही मोठा निर्णय घेताना सहकाऱ्यांची मदत घ्या. 

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी जोडीदारासोबत सुरू असलेला तणाव मिटण्याची शक्यता आहे. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. 

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी विवाहास योग्य व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव मिळतील. संकटातून मार्ग काढण्यासाठी मित्र मदत करतील. 

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक स्थितीत बदल जाणवतील, त्यामुळे तुमचा आनंद वाढेल.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी कामकाजासंबंधित चांगले विचार डोक्यात येतील. तुम्हाला जी आज अडचण वाटेल ती तुमच्यासाठी सकारात्मक बनेल.  

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी नव्या व्यक्तीसोबत सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवस चांगला आहे. 

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार करावा. काही लोकं तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील.

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी विनाकारण धावपळ करु नका. तब्येतीत चढ उतार होऊ शकतात. काही बेत आखत असाल तर ते सध्या कोणाला सांगू नका.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी पदोन्नतीमुळे तुमची जबाबदारी वाढेल. नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी कोणीतरही व्यक्ती नकळतपणे तुमची मदत करत असेल.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ लाभेल. जेवणाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. 

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी साथीदारासोबतच चांगला काळ व्यतीत कराल. कठीण प्रसंगात कुटुंबात सुख- शांती असणार आहे. 

मीन (Pisces)

आजच्या दिवशी नव्या व्यवसायाकडे आकर्षित व्हाल. काहीतरी नवे करण्याची इच्छा होईल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल.  

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts