2023 World Cup Virat Kohlis 10 Centuries Are The Most By Any Batter Against Sri Lanka In ODIs Interesting Stats And Trivia For India Vs Sri Lanka In ODIs

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli vs Sri Lanka : एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2023) मध्ये भारताची (India) विजयी वाटचाल सुरु आहे. सातव्या विजयासाठी टीम इंडिया  (Team India)  मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium)  उतरणार आहे. आतापर्यंत भारताने सलग सहा सामन्यांमध्ये विजय मिळवून गुणतालिकेतील दुसरे स्थान पटकावले आहे.  विजय रथावर स्वार टीम इंडियाचा (Indian Cricket Team) सामना आज श्रीलंका (India vs Srk Lanka) संघाशी होणार आहे.  श्रीलंकेचा पराभव करत टीम इंडिया उपांत्य फेरीत प्रवेश करेल.  श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) कडून चाहत्यांनाही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. श्रीलंकेविरुद्ध विराटची आकडेवारी पाहता भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विराट कोहली मुंबईत आज धावांचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे. 

श्रीलंकेविरोधात कोहलीची किंग – 

श्रीलंकेच्या गोलंदाजांसाठी रनमशीन विराट कोहली नेहमीच कर्दनकाळ ठरला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची आकडेवारी शानदार आहे.   विराटने श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत 52 वनडे सामने खेळले आहेत. यामधील 50 डावांत विराटला फलंदाजीची संधी मिळाली आहे. या 50 डावांमध्ये कोहलीने 62.65 च्या सरासरीने 2506 धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध विराटने आतापर्यंत 10 शतके आणि 11 अर्धशतके झळकावली आहेत. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे, त्यामुळे या सामन्यातही विराटकडून मोठी खेळी पाहायला मिळण्याची अशा आहे.

वानखेडे स्टेडिअमवर मैदानावर विराटचे आकडे
विराट कोहलीची मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवरील आकडेवारीही शानदार आहे. कोहलीने आतापर्यंत या मैदानावर सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 53.80 च्या सरासरीने 269 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर एकदिवसीय सामन्यात शतकही झळकावलं आहे. विश्वचषक 2023 मध्ये विराट कोहलीने सहा सामन्यांमध्ये 354 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. यंदाच्या विश्वचषकात तो 88.50 च्या सरासरीने धावा करत आहे. त्यामुळे वानखेडेच्या मैदानातही विराट आणखी एक शतक ठोकू शकतो. 

कोहली विक्रम रचण्यापासून एक पाऊल दूर
विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.  विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 48 शतके झळकावली आहेत. त्यामुळे विराट कोहलीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. श्रीलंकेविरुद्ध कोहलीने शतक ठोकल्यास वनडे विश्वचषकातील त्याचं हे चौथे शतक ठरेल. विराट कोहली सध्या लयीत आहे, त्यामुळे वानखेडेच्या मैदानावर त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. 

[ad_2]

Related posts