ICC Cricket World Cup 2023 Sara Tendulkar Reactions After Shubman Gill Missed A Century

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shubman Gill : वर्षभरात दमदार कामगिरी करूनही वर्ल्डकपमध्ये फाॅर्मशी काहीसा संघर्ष करत असलेल्या शुभमन गिलने आज (2 नोव्हेंबर)  श्रीलंकेविरुद्ध आपला क्लासिक खेळ केला. मात्र, गिलला शतक झळकावण्यात अपयश आलं. 29.6 षटकात शुभमन गिलच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला. शुभमन गिल 92 धावा करून बाद झाला. स्लो बाॅलवर गिलने यष्टिरक्षकापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू उसळला आणि बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेला. विराट कोहलीसह शुभमन गिलने दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली. शुभमन गिलने 92 चेंडूत 92 धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून 11 चौकार आणि 2 षटकार आले. 

गिलचे खेळीचे साराकडून कौतुक 

पुण्यानंतर मुंबईमध्येही टीम इंडियाचा सामना पाहण्यासाठी सारा तेंडुलकरने हजेरी लावली. गिलला शतक झळकावण्यात अपयश आलं. त्यानंतर साराचा चेहरा पडलेला दिसून आला. मात्र, त्यानंतर त्याच्या खेळीचे साराने उभ राहुन कौतुक केलं. विशेष म्हणजे आज सचिन तेंडुलकरहीम मैदानात उपस्थित आहे. 

एक नवीन व्हिडिओ व्हायरल 

शुभमन गिल सध्या त्याच्या नात्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून शुभमन गिलचे नाव सारा तेंडुलकरसोबत जोडले जात होते, परंतु कधीही त्यांचं नातं स्वीकारलेलं नाही. त्यांचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यानंतर चाहत्यांना ते एकमेकांना डेट करत असल्याची खात्री वाटते. 

मुंबईत लक्झरी मॉल Jio World Plaza लाँच करण्यात आला. या लॉन्च इव्हेंटमध्ये संपूर्ण बॉलिवूड जगत आणि अनेक क्रिकेटर्सनीही सहभाग घेतला होता. यादरम्यान शुभमन गिल देखील स्पॉट झाला होता, जिथे तो सारा तेंडुलकरसोबत दिसत होता. दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, साराने लाल फ्लोअर लांबीचा गाऊन घातला आहे, तर शुभमन गिल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे.

व्हिडीओमध्ये सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल जिओ वर्ल्ड प्लाझा येथील कार्यक्रमातून बाहेर पडताना दिसत आहेत, पण पापाराझी बाहेर उभे असलेले पाहताच ते तिथेच थांबले, त्यानंतर दोघेही वेगळे झाले.  मात्र, दोघांनी कितीही आपले नाते लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे चाहते त्यांना नेहमीच पकडतात.

आताही असेच काहीसे घडले. जेव्हा शुभमन आणि साराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला, तेव्हा लोकांनी पुन्हा एकदा दोघांमध्ये काहीतरी असण्याची शक्यता वर्तवली आहे. होय, ही वेगळी गोष्ट आहे की इतर सेलिब्रिटींप्रमाणे सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल देखील त्यांच्या नात्याच्या बातम्यांबद्दल उघडपणे काहीही बोलत नाहीत, परंतु हे दोघेही अनेकदा एकत्र भेटतात आणि एकमेकांसोबत स्पॉट होतात हे सत्य आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts