Shreyas Iyer Is Back With A Bang Fifty From Just 36 Balls Against Sri Lanka

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shreyas Iyer : पाकिस्तानविरुद्धच्या अर्धशतकाचा अपवाद सोडल्यास चाचपडत असलेल्या श्रेयस अय्यरला संघातून बाजूला करण्यासाठी सातत्याने टीका होत होती. मात्र, आज त्याने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. अवघ्या 36 चेंडूत अर्धशतकी खेळी करताना दमदार अर्धशतक झळकावले. गिल आणि कोहली शतकापासून चुकल्यानंतर अय्यरने आक्रमक फलंदाजी करताना संघाचा डाव सांभाळला. त्याने एक ठोकलेला षटकार वर्ल्डकपमधील सर्वात लांब ठरला. तब्बल 104 मीटर सिक्स त्याने ठोकला. श्रेयस अय्यर 56 चेंडूत 82 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तब्बल 6 सिक्स आणि तीन चौकार मारले. तो 47.3 षटकात बाद झाला. 

श्रेयस अय्यरनं 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या 6 डावात 33.50 च्या सरासरीने आणि 84.81 च्या स्ट्राईक रेटने केवळ 134 धावा केल्या आहेत. याशिवाय, तो स्पर्धेत त्याच्या जुन्या कमकुवतपणावर म्हणजेच शॉर्ट बॉलवर आऊट होताना दिसला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ट्रेंट बोल्टने शॉर्ट बॉलवर अय्यरला आपला शिकार बनवले. अय्यरला आतापर्यंत ती लय दाखवता आली नाही, त्यामुळे टीम इंडियाने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.

दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर, अय्यरने गेल्या 10 डावांमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे, परंतु तो अनेक प्रसंगी अपयशीही ठरला आहे. तर विश्वचषक स्पर्धेत अय्यरने सर्वाधिक विकेट्स टाकल्या आहेत. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा त्याच्याबाबत कठीण निर्णय घेऊ शकतो आणि श्रीलंकेविरुद्ध मधल्या फळीतील फलंदाज म्हणून इशान किशनला संधी देऊ शकतो.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts