Neral Matheran Minitrain Will Resume From November 4 Decision By Central Railway Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : पर्यटकांची दिवाळी गोड करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. माथेरानच्या (Matheran) मिनीट्रेनची (Minitrain) सेवा ही पुन्हा नेरळ (Neral) ते माथेरान (Matheran) अशी सुरु करण्यात आली आहे. 4 नोव्हेंबरपासून नेरळ – माथेरान – नेरळ ही मिनीट्रेनची सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेप्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. सध्या अमन लॉज ते माथेरान अशी सेवा सुरु आहे. पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज ही सेवा बंद करण्यात आली. पण ही सेवा आता पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. 

मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असणाऱ्या माथेरानला अनेक पर्यटक भेट देतात. मुंबईतील हिल स्टेशन अशी माथेरानची ओळख आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये माथेरान हे मुंबईकरांच्या फिरण्यासाठी अत्यंत योग्य असे डेस्टिनेशन असते. पण माथेरानच्या मिनी ट्रेनची सुविधा ही पावसाळ्यात अर्धवट सुरु असते. पण आता नेरळ ते माथेरान अशी ही सेवा पुन्हा एकदा सुरळीत होणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेकडू वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे. 

असं असेल मिनी ट्रेनचं वेळापत्रक

52103 नेरळवरुन 8.50 ला सुटेल आणि माथेरानला 11.30 वाजता सुटेल. 52105 ही दुसरी गाडी असेल. ती नेरळवरुन 10.25 वाजता सुटेल आणि 01.05 वाजता माथेरानला पोहचेल. या दोन्ही गाड्यांची सेवा ही दररोज असणार आहे. माथेरानवरुन 52104 ही गाडी 02.45 मिनिटांनी सुटेल आणि ती नेरळला 5.30 मिनिटांनी पोहचेल. 52106 ही दुसरी गाडी 04.00 वाजता माथेरानवरुन सुटेल आणि 6.40 ला नेरळला पोहचेल. या गाड्यांची सेवा देखील दररोज असणार आहे. 

‘या’ ट्रेनची रचना

या चारही ट्रेनमध्ये अत्याधुनिक वैशिष्ट्ये असणार आहेत.  ही एकूण सहा डब्यांची असणार आहे. यामध्ये तीन द्वितीय श्रेणी, एक विस्टाडोम कोच आणि दोन  द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅन असतील. त्यामुळे पर्यटकांना 

नेरळपासून माथेरानला जाण्यासाठी प्रवाश्यांसाठी अत्यंत सोयीस्कर अशी ही मिनीट्रेन असते. त्यामुळे ही बंद राहिल्यास माथेरानपर्यंत पोहचण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना पर्यटकांना करावा लागतो. पण ही सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याने पर्यटकांमध्येही उत्साह असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच जून ते ऑगस्ट दरम्यान  एक लाख 13 हजार 887 प्रवाशांनी या मिनी ट्रेनमधून प्रवास केल्याची माहिती देण्यात आली आहे. 

हेही वाचा : 

Shivsena : आम्हाला व्हिपचा ई मेल मिळालाच नाही, शिंदे गटाचा दावा, नार्वेकरांसमोर शिंदे-ठाकरे गट ई मेलवरुन भिडले; पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला

[ad_2]

Related posts