( प्रगत भारत । pragatbharat.com)
Venus Planet Gochar In Tula: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी दिवाळीनंतर अनेक ग्रह आपली राशी बदलणार आहेत. ज्यामध्ये धन दाता शुक्र ग्रह देखील गोचर करणार आहे.
येत्या 30 नोव्हेंबरला शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांना लाभ होणार आहे.
वृषभ रास (Taurus Zodiac)
शुक्राचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. शुक्र ग्रह तुमच्या राशीचा स्वामी आहे. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात या संक्रमणाचे शुभ परिणाम दिसतील. यावेळी तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळू शकतो. या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतो. बिझनेसमध्ये नवीन संधी मिळतील.
कुंभ रास (Kumbh Zodiac)
धनाचा दाता शुक्राच्या राशीतील बदल कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. शुक्राचं गोचर तुमच्या कुंडलीच्या नवव्या घरात जाणार आहे. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये यशही मिळेल. भागीदारीत केलेली गुंतवणूक आणि व्यवसाय शुभ परिणाम देणार आहे. आतापर्यंत तुमच्या मार्गात जे अडथळे येत होते ते दूर होतील. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात.
कन्या रास (Kanya Zodiac)
शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून धन गृहाला भेट देणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे. तुम्हाला तुमचे अडकलेले पेमेंट तेथे मिळू शकतं. तुमचं नशीब चमकू शकणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकणार आहे. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसेही मिळणार आहेत.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )