Pune News : महापालिकेच्या 93 रजा मुदत शिक्षकांची दिवाळी होणार गोड; शिक्षण सेवकांचे मानधन वाढीचे परिपत्रक महापालिकेकडून जारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : पुणे महापालिकेच्या प्राथमिक (Pune news) शाळेतील 93 शिक्षण सेवकांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार सर्व 93 रजा मुदत शिक्षकांचे मानधन सहा हजारावरुन 16 हजार करण्यात आला आहे. यासंदर्भातील परिपत्रक महापालिकेने काढले आहे. ऐन दिवाळीच्या मोक्यावर मानधनवाढीचे परिपत्रक काढण्यात आल्याने शिक्षण सेवकांनी आनंद व्यक्त केला असून मंत्री  पाटील यांचे आभार मानले आहेत.

पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत गेली 14 वर्षे मानधनावर काम करणाऱ्या 93 शिक्षणसेवकांना उच्च न्यायालयाने शिक्षण सेवेत कायम करुन वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश फेब्रुवारी 2023 मध्ये दिले होते. यासाठी न्यायालयाने सहा आठवड्यांची मुदत दिली होती. मात्र, महापालिकेच्या शिक्षण विभागाने या आदेशावर कार्यवाही केलेली नव्हती. त्यामुळे सर्व शिक्षण सेवकांनी जून 2023 मध्ये आंदोलनाचा पवित्रा घेत महापालिकेच्या विरोधात निदर्शने केली होती.

यावेळी जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यस्थी करुन शिक्षण सेवकांना न्याय देण्याचे आश्वस्त केले होते. त्यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा करुन तत्काळ सर्व 93 शिक्षण सेवकांना कायम करुन वेतन श्रेणी लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार, महापालिकेने फेब्रुवारी 2023 च्या शासन आदेशानुसार सर्व 93 शिक्षण सेवकांना सहा हजारावरुन 16 हजार मानधन करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचे परिपत्रक आज जारी करण्यात आले. परिपत्रकाद्वारे वित्त विभागाला तातडीने वेतन आदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व शिक्षणसेवकांनी आनंद व्यक्त केला असून, मंत्री पाटील  यांना धन्यवाद दिले आहेत.

नऊ वर्षानंतर वाढ

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयात नियुक्त शिक्षकांना 2000 सालापासून पहिली तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून मानधन दिले जाते. त्यानंतर त्यांना शिक्षक म्हणून कायम करून शासन नियमानुसार वेतन दिले जाते. पूर्वीच्या मानधनात सप्टेंबर 20211 मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानुसार सध्या प्राथमिक शिक्षकांना सहा हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना आठ हजार रुपये आणि उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षकांना नऊ हजार रुपये मानधन दिले जात होते. गेल्या नऊ वर्षांत शिक्षण सेवकांच्या मानधनात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे आपल्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी  शिक्षण सेवक आणि संघटनांकडून करण्यात येत होती. त्यासाठी अनेकवेळा आंदोलने देखील झाली. अखेर त्यांचं मानधन वाढवण्यात आलं आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएम मोदींविरोधात आक्षेपार्ह लिखाण, दोन गटांमध्ये जोरदार राडा, कार्यकर्ते भिडले…

[ad_2]

Related posts