Abu Azmi Targets Maharashtra Government Says All Parties Come Together For Meeting On Maratha Reservation But Avoid Samajwadi Party They Fear We Will Demand Muslim Reservation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Abu Azmi on Maratha Reservation: समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रईस शेख (MLA Rais Shaikh) यांच्या कार्यकाळास चार वर्ष पूर्ण झाल्यानं भिवंडीत समाजवादी पक्षाच्या परिवर्तन रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं. या सभेसाठी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी हे उपस्थित होते. या सभेत बोलताना अबू आझमींनी भाजपसह (BJP) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर मुस्लिम आरक्षणाच्या (Muslim Reservation) मुद्द्यावरून जोरदार टीका केली. मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली, मात्र समाजवादी पक्षाला टाळलं, त्यांना भीती आहे आम्ही मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा काढू, असं म्हणत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Samajwadi Party Abu Azmi)  यांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे. 

सकल मराठा आंदोलन करणाऱ्यांनी आपली ताकद दाखवली, त्यामुळे सरकार त्यांच्या पायाशी गेलं. मराठा आरक्षण प्रश्नावर सर्व पक्षीय सभा झाली, ज्यांचा एकही आमदार नाही, त्यांना आमंत्रण दिलं फक्त समाजवादी पक्षाला डावललं. आम्ही मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा मांडू याची भीती सर्व राजकीय पक्षांना वाटली होती. सरकार मराठा आंदोलकांना रात्री उशिरापर्यंत आंदोलन करायला परवानगी देतं. आम्ही मुस्लिम आरक्षणासाठी सहा नोव्हेंबर रोजी मुंबईत सायकल मोर्चा काढणार आहोत, त्याला पोलीस आडकाठी करत आहेत. पण आम्ही आंदोलनावर ठाम असून हिंमत असेल तर अडवून दाखवा, असा इशारा देत मुस्लिम आपली मक्तेदारी असल्याचा दावा करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुद्धा मुस्लिम आरक्षणासाठी काहीही केलं नाही, असा आरोप अबू आझमी यांनी केला आहे.  

काश्मीर फाईल्स हा चित्रपट बोगस असून माहिती अधिकारात काश्मीरमध्ये मागील तीस वर्षात हत्या झालेल्यांची संख्या 1730 आहे. त्यापैकी फक्त 79 काश्मिरी पंडित होते. तरी सरकार फक्त काश्मिरी पंडितांसाठी रडत बसली आहे. हिंदू मुस्लिम या एकतेमध्ये फूट टाकण्याचं काम नरेंद्र मोदी करत आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया देशात अराजकता मजवणारे या देशाला इस्लामिक राष्ट्र करण्याची भाषा करत होते. म्हणून त्यांच्यावर बंदी घातली. हा देश सेक्युलर आहे. हा देश हिंदू मुस्लिम यांचा आहे. पण या देशाला हिंदू राष्ट्र बनवणार अशा गर्जना करणाऱ्या भाजप आरएसएसवर कोणतीही बंदी नाही, असा आक्षेप अबू आझमी यांनी नोंदवला आहे.

आबू आझमींचं मुख्यमंत्र्यांना नाराजी व्यक्त करणारं पत्र 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्व पक्ष नेत्यांच्या बैठकीत समाजवादी पक्षाला आमंत्रण न दिल्यामुळे आमदार अबू आजमी यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) पत्र लिहिलं. मराठा समजाला आधीही आम्ही पाठिंबा दिला होता, त्यांच्यासोबत मुस्लिमांनाही आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली. मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय 32 नेत्यांची  बैठक पार पडली. त्यामध्ये अबू आझमी यांना बोलावण्यात आलं नव्हतं. 

[ad_2]

Related posts