Mumbai-Madgaon Vande Bharat Express Inauguration Programme Cancelled Due To Odisha Train Accident

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai-Madgaon Vande Bharat Express:  मुंबई-मडगाव (Mumbai Goa Vande Bharat Express) दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस‘चा (Vande Bharat Express) शनिवारी होणारा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या (Odisha Railway Accident) पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा उद्घाटन कार्यक्रम मडगाव येथे पडणार होता. उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठीची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, अपघातामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्याची पहिली वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता. मुंबई-मडगाव ही भारतातील 19 वी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. मुंबई ते मडगाव हे अंतर वंदे भारत एक्स्प्रेस सात तास 50 मिनिटात पूर्ण करणार आहे.

वंदे भारत ट्रेनची वेळ आणि थांबे 

मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस कोकणवासियांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्याला सहा दिवस चालवण्याचं सध्या प्लॅनिंग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मडगाव, थिविम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी या स्थानकांवर वंदे भारत ट्रेन थांबेल. सध्या दिलेल्या प्रस्तावानुसार, सीएसएमटी वरून सकाळी 5.35 ला ट्रेन सुटेल, तर मडगाव येथे दुपारी 1.15 वाजता वंदे भारत ट्रेन पोहोचेल. त्यानंतर लगेच मडगाव वरुन तीच वंदे भारत दुपारी 2.35 वाजता मुंबईकडे रवाना होईल आणि रात्री 10.25  वाजता ट्रेन मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. वंदे भारत एक्सप्रेस ही कोकण मार्गावर धावणारी सर्वात जलद एक्सप्रेस असणार आहे. तेजस एक्सप्रेसपेक्षा देखील एक तास लवकर ही ट्रेन मडगावला पोहोचेल, त्यामुळे या ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. 

ओडिशात रेल्वेचा भीषण अपघात, 50 ठार

ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromondel Express) आणि  मालगाडी यांचा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला (Coromondel Express Accident) धडक बसली. त्यानंतर रेल्वेचे काही डब्बे रुळावरून घसरले. बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशासनाने अपघाताबाबत आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार 132  प्रवासी जखमी झाले असून 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.  

अपघात कशामुळे झाला?

कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला. सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे दोन्ही गाड्या एकाचवेळी एका रुळावर आल्याचे म्हटले जात आहे. 

मात्र, अद्याप या अपघाताबाबत रेल्वेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नई ते पश्चिम बंगालमधील हावडा मार्गे ओडिशा पर्यंत धावते.

[ad_2]

Related posts