New Zealand Vs Pakistan Haris Rauf Bowls The Most Expensive Spell In Pakistan World Cup History

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बंगळूर : शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी विश्वचषक 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हे दोन्ही गोलंदाज विश्वचषक सामन्यात पाकिस्तानसाठी सर्वात महागडे गोलंदाज ठरले. हरिस रौफने 85 धावा आणि शाहीन आफ्रिदीने 10 षटकात 90 धावा दिल्या. यादरम्यान शाहीनला एकही विकेट मिळाली नाही तर हॅरिसला एक विकेट मिळाली. 

दुर्दैवाचा फेरा म्हणजे, हॅरीस आणि शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानच्याच हसन अलीचा विक्रम मोडला. ज्याने 2019 विश्वचषकात भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 10 षटकात 1 बळी घेत 84 धावा दिल्या होत्या. पण हसन अलीचा हा लाजिरवाणा विक्रम एकाच सामन्यात आधी हॅरिस रौफ आणि नंतर शाहीन शाह आफ्रिदीने मोडला.

याच विश्वचषकात हरिस रौफने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात 10 षटकात 83 धावा दिल्या होत्या. मात्र, त्यावेळी त्याने 3 विकेट्सही आपल्या नावावर केल्या होत्या. आज पाकिस्तानचा संघ एम चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. 2023 च्या विश्वचषकाचा 35 वा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे.

पाकिस्तानसाठी सर्वात महागडे गोलंदाज (एका डावात)

  • 0/90 – शाहीन आफ्रिदी विरुद्ध न्यूझीलंड, बंगळूर, आज*
  • 1/85 – हॅरिस रौफ विरुद्ध न्यूझीलंड, बंगळूर, आज*
  • 1/84 – हसन अली विरुद्ध भारत, मँचेस्टर, 2019
  • 3/83 – हॅरिस रौफ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बंगळूर, 2023

या सामन्यात शाहीन आफ्रिदीचा आणखी एक विक्रम मोडला गेला. शाहीन आफ्रिदीला 24 एकदिवसीय डावात एकही विकेट न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय हॅरिस रौफने गोलंदाज म्हणून विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक १६ षटकार मारून घेण्याचा लाजिरवाणा विक्रमही केला आहे.

न्यूझीलंडने 400 चा टप्पा पार केला

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण बाबर आझमचा हा निर्णय न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकांत 6 गडी गमावून 401 धावा केल्या. रचिन रवींद्रने संघासाठी 108 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय कर्णधार केन विल्यमसनने 95 धावा केल्या.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts