ODI World Cup 2023 Virat Kohli Completes 49th Century Equals Sachin Tendulkar Milestone Against South Africa Eden Gardens

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli vs Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar) वनडेतील शतकांच्या विक्रमाची रनमशीन विराट कोहलीने (Virat Kohli ) बरोबरी केली आहे.  विराट कोहलीने आफ्रिकेविरोधात शतक ठोकत सचिनच्या वनडेतील शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने वनडेमध्ये 49 शतके ठोकली होती. आता या विक्रमाची विराट कोहलीने आज बरोबरी केली आहे. विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकातील दुसरे शतक झळकावले. सचिनच्या वनडे शतकांची बरोबरी केल्यानंतर विराट कोहलीवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  विराट कोहलीने अवघ्या 277 डावात 49 वे वनडे शतक ठोकले. सचिन तेंडुलकरला 49 वनडे शतकांसाठी 452 डाव लागले होते.  

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर एके काळी क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या फलंदाजाच्या नावावर अनेक मोठे विक्रमही नोंदवले गेले आहेत. पण भारतीय संघाचा सध्याचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याचा वनडेतील शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराट कोहलीच्या शतकानंतर ईडन गार्डन स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. 

विराट कोहलीचे झंझावती शतक –

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने वादळी सुरुवात करुन दिली. पण एकापाठोपाठ एक दोन धक्के बसल्यानंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला.  विराट कोहलीने मैदानावर वर्चस्व गाजवले. विराट कोहलीने  श्रेयस अय्यरच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने 119 चेंडूमध्ये शतक ठोकले. सुरुवातीच्या षटकात विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. चांगल्या चेंडूला मान देत विराट कोहलीने एकेरी दुहेरी धावसंख्या काढली. त्यानंतर वेगाने धावा केल्या. विराट कोहलीने आपल्या शतकी खेळीत 10 चौकारांचा समावेश आहे.

सचिन तेंडुलकरची वनडेमधील कामगिरी –

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. सचिन तेंडुलकरने 452 वनडे डावात 44.8 च्या सरासरीने तब्बल 18 हजार 426 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याने 49 शतके ठोकली आहेत. त्याशिवाय 96 अर्धशतकेही लगावली आहेत. यादरम्यान त्याने 195 षटकार आणि 2016 चौकारांचा पाऊस पाडला आहे. सचिन तेंडुलकर वनडेमध्ये 41 वेळा नाबाद राहिला आहे. सचिन तेंडुलकरची वनडेमधील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 200 धावा इतकी आहे.  

Virat Kohli vs Sachin Tendulkar Comparison,  सचिन आणि विराटची नेहमीच तुलना –

 सचिन तेंडुलकरच्या विक्रमांची बरोबरी करणे कोणत्याही खेळाडूला अशक्य आहे, पण अनेक वेळा सध्या खेळणाऱ्या खेळाडूंची तुलना क्रिकेटच्या देवासोबत केली जाते. यामध्ये सर्वात मोठं नाव म्हणजे, विराट कोहलीचं होय. स्वत: सचिन तेंडुलकरनेही माझा विक्रम विराट कोहली अथवा रोहित शर्मा मोडतील, असं वक्तव्य केले होते. विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा आणि शतकांचा पाऊस पडल्यानंतर अनेकांनी त्याची तुलना सचिन तेंडुलकरसोबत केली आहे. पण  या दोन दिग्गजांची तुलना करणं कठीण आहे, कारण दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या युगात राहत होते आणि दोघांच्या काळात क्रिकेटचा खेळ सारखा नव्हता. 

[ad_2]

Related posts