Team India Caption Rohit Sharma Reveal Over Why He Backed On Shreyas Iyer Despite His Failure Over Last Couple Of Matches

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit Sharma : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर 327 धावांचे लक्ष्य होते. पण त्यांच संपूर्ण संघ 27.1 षटकात केवळ 83 धावांवरच गारद झाला. मात्र, या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली. रोहित शर्मा म्हणाला की, जर तुम्ही आमचे शेवटचे तीन सामने पाहिल्यास आमच्या संघानं परिस्थितीनुसार स्वत:ला चांगलं जुळवून घेतले. इंग्लंडविरुद्ध आम्ही दडपणाखाली होतो, पण चांगली धावसंख्या उभारल्यानंतर उर्वरित काम वेगवान गोलंदाजांनी पूर्ण केले.

तरी मी त्याला माझ्या संघात घेईन! 

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, विराट कोहली परिस्थितीनुसार खेळतो. आमचे गोलंदाज योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतात, त्यानंतर खेळपट्टी काम करते. याशिवाय रोहित शर्माने श्रेयस अय्यरबद्दल मत व्यक्त केले. भारतीय कर्णधार म्हणाला की, श्रेयस अय्यर अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नसला तरी मला त्याला खेळताना पाहायला आवडेल. आम्हाला या खेळाडूवर विश्वास ठेवायला हवा. कोणताही खेळाडू दररोज चांगला खेळ करू शकत नाही.

रोहित शर्मा शमी-गिल आणि जडेजाबद्दल काय म्हणाला?

रोहित शर्माने सांगितले की, मोहम्मद शमी पुनरागमनानंतर ज्या प्रकारची गोलंदाजी करत आहे त्यावरून त्याची मानसिकता दिसून येते. त्याचवेळी मी शुभमन गिलसोबत बराच काळ फलंदाजी करत आहे. आमच्याकडे कोणतीही रणनीती नाही, आम्ही फक्त ओव्हर टू ओव्हर खेळण्याचा प्रयत्न करतो आणि परिस्थितीनुसार.

रवींद्र तिन्ही फॉरमॅटमध्ये सतत खेळत आहे, या खेळाडूने आमच्यासाठी चांगली कामगिरी केली आहे. जडेजा आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आज आम्ही पाहिले. त्याने शेवटच्या षटकांमध्ये धावा केल्या, त्यानंतर गोलंदाजीत 5 खेळाडू बाद केले. त्याची भूमिका काय आहे, हे जडेजाला चांगलेच ठाऊक आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts