Adani Group In Talks To Sell Entire 43.97 Percent Stake In Adani Wilmar Company

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  भारतीय अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी समूहाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.  गौतम अदानी लवकरच एका कंपनीतील आपले शेअर्स विकणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्तानंतर संबंधित कंपनीच्या शेअर दरात घसरण झाली आहे. अदानी समूह आता पायाभूत सुविधा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

एका वृत्तानुसार, खाद्यतेल उत्पादक कंपनी अदानी-विल्मर (Adani Wilmar) कंपनीतील आपला हिस्सा अदानी विकण्याचा विचार करत आहेत. याबाबत काही बैठकाही झाल्याची माहिती आहे. याबाबतचे वृत्त समोर येताच कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

अदानी विल्मारमध्ये ग्रुपची हिस्सेदारी किती?

फॉर्च्यून ब्रँड अंतर्गत खाद्यतेल आणि पॅकेज्ड अन्नधान्य विकणाऱ्या अदानी विल्मर कंपनीमध्ये अदानी समूहाचा एकूण हिस्सा 43.97 टक्के आहे.  ‘बिझनेस टुडे’ने प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, समूह आता एफएमसीजी व्यवसायातून बाहेर पडण्याची तयारी करत आहे. आपली भागेदारी विकण्यासाठी काही बहुराष्ट्रीय कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. एका महिन्यात कंपनीतील हिस्सेदारी विकण्याबाबतच्या निर्णयावर  शिक्कामोर्तब होईल असे या वृत्तात म्हटले आहे.

किती रुपयांमध्ये होऊ शकते डील?

मात्र, या संदर्भात अदानी समूहाकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. वृत्तानुसार, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह अदानी-विल्मरमधील आपला हिस्सा 2.5-3 अब्ज डॉलरमध्ये विकण्याची अपेक्षा करत आहे. अदानी-विल्‍मर हा सिंगापूरस्थित विल्‍मर इंटरनॅशनल सोबतचा जॉइंट व्हेंचर आहे. 
अदानी समूह आपले संपूर्ण लक्ष पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रातील गुंतवणुकीवर केंद्रित करत असल्याचे वृत्तात म्हटले आहे. अदानी विल्मरमधील निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय हा त्याच निर्णयाचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. 

कंपनीचे तिमाही निकालही चांगले नाही

‘अदानी-विल्मर’ने बुधवारी आपले तिमाही निकाल जाहीर करताना सांगितले होते की, सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 130.73 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. खाद्यतेलाचे उत्पादन करणाऱ्या अदानी समूहाची मुख्य कंपनी अदानी विल्मारला उत्पन्नापेक्षा जास्त खर्चामुळे हा तोटा सहन करावा लागला आहे. यामुळे गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत कंपनीला 48.76 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

शेअर्सवर परिणाम

Adani Wilmar चे बाजार भांडवल (Adani Wilmar MCap) 4099 कोटी रुपये आहे आणि अदानी समूह या कंपनीतील भागभांडवल विकण्याचा विचार करत असल्याची बातमी येताच, त्याचा थेट परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून आला. अदानी विल्मरच्या शेअर दरात घसरण होऊन 311.50 रुपयांवर स्थिरावला. अदानी विल्मरची 52 आठवड्यांचा उच्चांक हा 703.40 रुपये आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये झाली होती लिस्टींग

अदानी विल्मरचे शेअर्स फेब्रुवारी 2021 शेअर बाजारात लिस्ट झाले होते. त्यावेळी त्याची लिस्टिंग किंमत फक्त 221 रुपये होती. शेअर लिस्ट झाल्यानंतर कंपनीच्या शेअर दरात सातत्याने वाढ झाली. एकदा या शेअरने 878.35 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक दर गाठला. 

[ad_2]

Related posts