Vikram Rathour On Indian Cricket Team Captain Rohit Sharma World Cup 2023 Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vikram Rathour On Rohit Sharma : विश्वचषकात (World Cup 2023) लागोपाठ आठ विजयाची नोंद करत टीम इंडिया (Team India) भन्नाट फॉर्मात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) धावांचा पाऊस पाडत आहे. कर्णधार रोहित शर्मा वादळी सुरुवात करत आहे तर विराट कोहली अखेरपर्यंत फलंदाजी करत आङे. रोहित शर्मा प्रत्येक सामन्यात पॉवरप्लेमध्ये चौकर आणि षटकारांचा पाऊस पाडत आहे. कोलकात्यामध्येही (IND vs SA) रोहित शर्माने संथ खेळपट्टीवर वेगाने धावा जमवल्या. त्यामुळेच भारतीय संघाने तीनशे धावांचा पल्ला पार केला. रोहित शर्माने  24 चेंडूत 40 धावा केल्या. यामध्ये  6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रोहित शर्मान पाया रचल्यानंतर विराट कोहलीने कळस चढवला. रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीवर आणि रणनीतीवर फलंदाजी कोच विक्रम राठौर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय बॅटिंग कोच विक्रम राठौर काय म्हणाले ?

फलंदाजी कोच विक्रम राठौर म्हणाले की, रोहित शर्मा भारतीय संघाचे यशस्वी नेतृत्व करत आहे. खासकरुन सलामी फलंदाज म्हणून रोहित शर्मा देत असलेली सुरुवात कौतुकास्पद आहे. रोहितच्या आक्रमक फलंदाजीचा भारताला मोठा फायदा होतोय. रोहित शर्माला या विश्वचषकात फक्त एकदाच शतकाचा टप्पा ओलांडता आला. पण त्याने प्रत्येक सामन्यात वेगवान सुरुवात करून दिली आहे.  

विक्रम राठौर म्हणाले की, अशाप्रकारे खेळण्याची कल्पना स्वतः रोहित शर्माची आहे. रोहित शर्मा स्वतः जबाबदारी घेऊन आक्रमक फलंदाजी करत आहे. रोहित शर्मा ज्या पद्धतीने खेळत आहे ते टीम इंडियासाठी फायद्याचे आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्माने लुंगी एनगिडी आणि मार्को यान्सन यांना स्थिरावण्याची संधी दिली नाही. त्यामुळे दोन्ही गोलंदाज योग्य लाइन लेंथसाठी झगडत राहिले.  

‘आम्हाला जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत’

विक्रम राठौर म्हणाले की, प्रत्येक सामन्यात आम्हाला जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. जितक्या धावा होतील तितक्या करायच्या आहेत.  रोहित शर्मा आणि शुभमन गिलची सुरुवात धमाकेदार होतेय. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर वेळ घेऊन खेळू शकतात. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानाच्या खेळपट्टीवर केशव महाराज धोकादायक ठरू शकतो, याचा अंदाज आला होता.  पण रोहित शर्माने संघाला ज्या प्रकारची सुरुवात करुन दिली त्यामुळे बाकीच्या फलंदाजांना वेळ काढून खेळण्याची संधी मिळाली. हा आमच्या रणनीतीचा भाग होता. त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो.
 

[ad_2]

Related posts