Fire Break Out At Bhiwandi Factory Mother And Son Dies In Fire Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भिवंडी:  गोदामाला लागलेल्या आगीतून (Fire) आपल्या तीन वर्षाच्या मुलाला वाचवण्यासाठी आईने आगीत उडी घेतली. मात्र, मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आईला आणि तिच्या पोटच्या गोळ्याला काळानं गाठलं असल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कामगार वर्गात शोककळा पसरली आहे. 

भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील पारसनाथ कंपाऊंड येथील पहिल्या मजल्यावरील टेक्सराईज कापसापासून उशी बनवणारी शेजल एंटरप्रायझेस हा कारखाना, गोदाम आहे. या गाळ्यास सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटने लागली. या आगीत काम करणारी महिला आणि तिच्यासोबत आलेला तीन वर्षीय चिमुकला होरपळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शकुंतला रवी राजभर  (वय 35) आणि प्रिन्स राजभर (वय 3) असे आगीत जळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

कंपनीच्या गाळ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानंतर या आगीची माहिती मिळताच कंपनीमध्ये काम करणारे महिला-पुरुष कामगार कंपनी मधून बाहेर पळाले. त्यामध्ये शकुंतला ही सुद्धा होती. परंतु ती बाहेर पडल्यावर तिच्या सोबत आलेला तिचा लहान तीन वर्षांचा प्रिन्स नावाचा मुलगा आत मध्ये राहिल्याचे लक्षात आले. त्यानंतर शकुंतलादेवी पुन्हा आत मध्ये मुलाला घेण्यासाठी पळाली. ती त्यानंतर बाहेर पडलीच नाही. 

आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. मात्र, त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्याने खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्यात आले. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी  छतावरील स्लॅब तोडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. गोदामाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या बाथरूम जवळ मायलेकांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी स्थानिक नारपोली पोलिस आणि तहसीलदार कार्यालयातील अधिकारी दाखल झाले. या अपघातात जीव गमावलेल्या मायलेकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले आहेत.

रायगड MIDC केमिकल कंपनीतील 11 कामगारांचा होरपळून मृत्यू, तीन दिवसानंतर सर्व मृतदेह सापडले

 रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील (Raigad Mahad MIDC fire) केमिकल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत अडकलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 11 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. एनडीआरएफच्या तीन दिवसांच्या शोधकार्यानंतर सर्व 11 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. या कंपनीत गॅस गळतीमुळे (Gas leakage) आधी स्फोट झाला आणि मग आग भडकली होती. 

महाडमधील ब्लू जेट केमिकल कंपनीत (Blue Jet Healthcare company fire) आग लागल्यानंतर सुरूवातीला 11 कामगार अडकल्याची भीती होती. तर पाच जणांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर रविवारपर्यंत 9 जणांचे मृतदेह सापडले होते तर दोन मिसिंग होते. आता सर्वच्या सर्व 11 का

[ad_2]

Related posts