Virat Kohli Fan Unique Offer On Maqbool Chicken Biryani Owner Danish Rizwan Muzaffarnagar World Cup 2023 News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli Fan Unique Offer : एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये टीम इंडियाची विजयी वाटचाल कायम आहे. भारतीय खेळाडूंचं जोरदार प्रदर्शन पाहायला मिळत आहे. टीम इंडिया (Team India) चा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. कोहलीचे भारतातच (India) नाही तर जगभरात लाखो चाहते (Virat Kohli Fans) आहेत. जे त्याचं कौतुक करताना थकत नाहीत. भारतातही कोहलीचा असाच एक जबरा फॅन (Kohli Special Fan) आहे, ज्याने खास ऑफर सुरु (Virat Kohli Fan biriyani Offer) केली आहे. विराट कोहलीच्या या फॅनची सध्या चर्चा रंगली आहे. कोहली सामन्यामध्ये जेवढ्या धावा काढणार, चिकन बिर्याणीवर तेवढीच सवलत देण्याची ऑफर आहे.

विराटचा ‘जबरा फॅन’! 

विराट कोहलीच्या या जबरा फॅनचं नाव दानिश रिजवान (Danish Rizwan) आहे. दानिश उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) तील मुजफ्फरनगर (Muzaffarnagar) येथील रहिवासी आहे. त्याने त्याच्या प्रसिद्ध ‘मकबूल बिर्याणी’ दुकानात खास ऑफर ठेवली आहे. विश्चचषकाच्या सामन्यात कोहली जेवढे रन करणार तेवढी सूट त्याच्या दुकानातील चिकन बिर्याणीवर देण्याची भन्नाट ऑफर या चाहत्याने दिली आहे. 

कोहलीच्या चाहत्याकडून खास ऑफर

भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यानही रविवारी कोहलीचा वाढदिवस होता, त्या दिवशी कोहलीने शतकी खेळी केल्यामुळे चिकन बिर्याणीवर 100 टक्के सूट दिली होती. कोहलीनेच शतक झळकावून चाहत्यांना वाढदिवसाची भेट दिली होती. विराटचे शतक साजरे करण्यासाठी, मुझफ्फरनगरमधील मकबूल चिकन बिर्याणीच्या दुकानात 100 टक्के सवलत म्हणजेच चिकन बिर्याणीची मोफत प्लेट शेकडो लोकांना वाटण्यात आली, ज्यांनी बिर्याणीसाठी आधीच बुकिंग केलं होतं. 

विराटचे जेवढे रन, चिकन बिर्याणीवर तेवढं डिस्काऊंट

त्याआधीच्या भारत-श्रीलंका सामन्यात विराट कोहलीने 88 धावा केल्या होत्या, त्यामुळे त्या दिवशी त्याच्या दुकानात चिकन बिर्याणीच्या प्लेटवर 88 टक्के सूट देण्यात आली होती. त्यामुळे 60 रुपयांना मिळणारी चिकन बिर्याणीची थाळी इथे सात रुपयांना मिळत होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts