Diwali good news eknath shinde announces diwali bonus for mumbai civic body employees

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी 26 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज येथे केली.

वर्षा निवासस्थानी यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या (BMC) सर्व कामगार, कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळे आता बीएमसी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून बीएमसी चालवणारे खोके सरकार दिवाळी बोनस देणार आहे की नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला होता. त्यानंतर आता शासनाने मोठी निर्णय घेतला असून बोनस जाहीर करण्यात आला आहे.

ठाणे महानगरपालिकेकडून (Thane Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये (Diwali Bonus)  भरघोस 20 टक्के वाढ करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी 18 हजार रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये 20 टक्के वाढ झाली असून 21 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून (Kalyan Dombivali Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना 18 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 16 हजार 500 रुपये इतका बोनस दिला होता. 


हेही वाचा

HBT क्लिनिकमध्ये आता फिजिओथेरपी उपलब्ध होणार

[ad_2]

Related posts