( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 9 November 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी कौटुंबिक जीवनात चढ-उतार येतील. खर्चात थोडी काळजी घ्या अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. धार्मिक कार्य आणि उपासनेत मन व्यस्त राहील.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवन आनंदी राहील. वैयक्तिक संबंधांमध्ये प्रेम कायम राहील.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी कोणतंही नवीन काम सुरू करू नका. खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी कार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल आणि तुमच्या प्रतिभेची प्रशंसा होईल. कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल होतील.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींनी ध्यान आणि योगाने तुमचा राग शांत करण्याचा प्रयत्न करा. विवाहित लोक आज त्यांच्या जोडीदाराच्या वागण्याने थोडे निराश होऊ शकतात.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी नशिबाची साथ मिळाल्याने काही रखडलेली कामेही पूर्ण होतील.कौटुंबिक वातावरणही सकारात्मक राहील.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी प्रगती करण्याची संधी आहे. मोठ्यांचे आशीर्वाद आज मदत करतील. अविवाहितांसाठी आज स्थळं येणार आहेत.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी तुम्हाला कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. घरातील काही कार्यक्रमामुळे कुटुंबातील लोकांची चलबिचल होऊ शकते.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी खास व्यक्तीच्या भेटीनं तुम्ही भारावून जाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांवर तुमच्या कामाचा प्रभाव असेल.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी पैशांची उधळपट्टी टाळा. विवाहित महिला एखादा नवा दागिना खरेदी करु शकतात. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )