World Cup 2023 Semifinal Number One India Vs New Zealand At Mumbai S Wankhede Stadium On 15 November Ind Vs Nz

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs New Zealand World Cup 2023 : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. न्यूझीलंडने बेंगलोरमध्ये लंकादहन करत आपले सेमीफायनलचे तिकिट जवळपास निश्चित केलेय. काही चमत्कार झाला तरच पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळेल. नाहीतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वानखेडे स्टेडिअमवर सेमीफायनलचा सामना निश्चित झालाय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघाचा नेटरनरेट अतिशय खराब आहे, त्यामुळे त्यांची विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचण्याची शक्यताही धुसूर आहे.  

भारत-न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनल – 

भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंडसोबत टीम इंडियाचा सेमीफायनल सामना होणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना होईल. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान संघाने चमत्कार केला नाही तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनलचा सामना होईल. वानखेडे स्टेडियमवर रोहित आणि विल्यमसन यांच्यात सेमीफायनलची लढत होणार आहे. जिंकणारा संघ 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये फायनलचा सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे. त्यांच्यातील विजेता 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये उतरेल. 

 याआधीही भारत आणि न्यूझीलंडमध्ये उपांत्य फेरीचा सामना – 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 2019 मध्ये उपांत्य फेरीचा सामना झाला होता. इंग्लंडमध्ये झालेल्या या सामन्यात भारताला 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. 2019 मध्येही टीम इंडिया गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होता. आताही 2019 मधीलच स्थिती आहे. भारतीय संघ वानखेडेवर न्यूझीलंडचा पराभव करत वचपा काढण्यासाठी मैदानात उतरले. यावेळी भारतीय संघामध्ये अधिक समतोल दिसत आहे. त्यात घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे पारडे जड आहे. 

पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे समीकरण काय ?

इंग्लंडची प्रथम फलंदाजी असल्यास – 

शनिवारी इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी केल्यास पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात येईल. समजा इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 300 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानला हे आव्हान फक्त सहा षटकात पार करावे लागेल. तेव्हाच त्यांचा रनरेट न्यूझीलंडपेक्षा चांगला होईल. त्यामुळे पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टातच आलेय. 

पाकिस्तानची प्रथम फलंदाजी आल्यास –

पाकिस्तानला उपांत्य फेरीत स्थान पटकावण्यासाठी इंग्लंडचा 275 पेक्षा जास्त धावांनी पराभव करावा लागेल. पाकिस्तान संघाची प्रथम फलंदाजी आल्यास त्यांना 400 पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारावा लागेल. त्यानंतर इंग्लंड संघाला 125 पेक्षा कमी धावसंख्येत गुंडाळावे लागेल.

[ad_2]

Related posts