Mumbai Rain  News Heavy Rain In Thane Mumbai Imd 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai Rain : मुंबईसह (Mumbai) उपनगरात अचानक पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. मुंबईतील पूर्व उपनगरात घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, गोवंडी अशा सर्वच परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. या अवकळी पावसाने मुंबईकरांची भलतीच तारांबळ उडाली आहे. सुमारे अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस कोसळत आहे

ठाण्यासह नवी मुंबईतही जोरदार पाऊस 

सुमारे अर्ध्या तासापासून मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे.यामुळं दिवाळीसाठी खरेदीला किंवा भेटीगाठी घेण्यास बाहेर पडलेल्या मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली आहे. नवी मुंबऊतही जोरदार पाऊस सुरु आहे. नवी मुंबईतील ऐरोली,घणसोली, कोपरखैरणे  भागात जोरदार पाऊस सुरु आहे. अचानक पडलेल्या पावसामुळं लोकांची तारांबळ उडाली आहे. कल्याण डोंबीवलीसह कळवा, मुंब्रा, ठाणे आणि ग्रामीण परिसरात वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे. या पावसामुळं हवेत गारवा निर्माण झाला आहे. 

[ad_2]

Related posts