Agriculture News Success Story Young Farmers Successful Experiment In Pomegranate Farming

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Success Story : अलिकडच्या काळात काही शेतकरी पारंपारीक पिकांची लागवड न करता आधुनिक पद्धतनं वेगळ्या प्रकारची शेती करत आहे. कमी खर्चात, योग्य नियोजनाद्वारे भरघोस उत्पादन घेत आहेत. असा एक वेगळा प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवड येथील युवा शेतकऱ्याने केला आहे. शंकर भगवान लटके या शेतकऱ्याने दोन एकर डाळिंब शेतीतून लाखोंचा नफा मिळवला आहे. या शेतकऱ्याच्या वेगळ्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. 

आत्तापर्यंत 10 टन डाळिंबाची विक्री 

सीना नदीकाठी मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती केली जाते.जिकडे बघेल तिकडे ऊसाचे क्षेत्र दिसते. मात्र, ज्यावेळी पाऊस कमी होतो, त्यावेळी ऊसाची शेती अडचणीत येते. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळं काही शेतकरी कमी पाण्याची पीकं घेत आहेत. केवड येथील शेतकरी शंकर पाटील यांनी डाळिंब शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतकऱ्याकडे देखील ऊसाची भरपूर शेती होती. शंकर लटके यांनी दोन एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली आहे. आत्तापर्यंत 10 टन डाळिंबाची विक्री केली आहे. या डाळिंबाला प्रति किलोला 110 रुपयांचा दर मिळाला आहे.  अद्यापही 15 टन माल निघणे अपेक्षीत असल्याची माहिती शंकर लटके यांनी दिली. 

 25 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत

शंकर लटके यांनी दिलेल्या माहितीनुसार 25 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत आहे. सध्या झाडांना भरपूर माल आहे. राहिलेल्या मालाला 100 रुपये किलो दर मिळण्याची शक्यता आहे. मी देखील ऊसाची शेती करत होतो. पण उजनी धरणात पाण्याचा साठा कमी असल्यामुळं डाळिंबाची शेती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शंकर लटके यांनी दिली.   

कमी पावसाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फटका

उजनी धरणाचा मोठा फायदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होत आहे. पण पुणे जिल्ह्यात जर चांगला पाऊस  झाला नाही तर उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरत नाही. त्यामुळं नदीला पाणी सोडणं शक्य होत नाही. याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळं काही शेतकरी कमी पाण्याची पीकं घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर्षी देखील राज्यासह  देशात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट पडली आहे. त्यामुळं उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं नाही. त्यामुळं सीना नदीकाठच्या ऊसाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Success Story : कौतुकास्पद! चार बाय चारच्या खोलीत फुलवली केशरची बाग, तरुण दाम्पत्याचा यशस्वी प्रयोग 

[ad_2]

Related posts