Nagpur Maharashtra Illegal 48 Cartridges With 5 Pistols Seized Again In Nagpur Crime Detail Marathi Latest News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात ( Nagpur City ) गेल्या काही काळापासून गुन्हेगारी (Crime) फोफावत आहे. एकीकडे गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून दुसरीकडे गुन्हेगारीचं स्वरुप देखील बदलत आहे. त्यातच पुन्हा नागपूर तहसील पोलीस स्थानकाच्या  (Nagpur Police Action) कारवाईमुळे पिस्तूल विक्री करणाऱ्या (Nagpur Illegal Arms Racket Busted)  गुन्हेगारांचे मोठे रॅकेट उघडकीस आले.

नागपुरातील तहसील पोलीस स्थानकाअंतर्गत काही दिवसांपूर्वी झालेल्या एका लॉज मालकाच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.  त्यावेळी नागपूर पोलिसांनी 9 पिस्तूलं आणि 85 जिवंत काडतुसं जप्त केली. त्याच प्रकरणी तपासाचे धागेदोरे पुढे गेल्यावर आणखी 5 पिस्तूलं आणि 48 जिवंत काडतूसं जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

नेमकं काय घडलं?

25 ऑक्टोबर रोजी तहसील पोलीस स्थानकाच्या हद्दीत मोमीनपुरा परिसरात एका खाजगी गेस्ट हाऊस संचालकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी तपास करताना फिरोज खान नावाच्या गुन्हेगाराने हत्या करणाऱ्या आरोपींना पिस्तूल आणि गोळ्या पुरवल्याचं उघडकीस आलं. फिरोज खानची चौकशी केल्यानंतर मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील इमरान आलम नावाचा गुन्हेगार नागपुरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रपुरवठा करत असल्याचे उघड झाले. तेव्हा फिरोज खान आणि इमरान आलम च्या दोन ठिकाणातून 9 पिस्तूलं आणि 84 काडतुसं जप्त करण्यात आली. आता त्याच प्रकरणी इमरान आलमच्या चौकशीनंतर आणखी 5 पिस्तूलं आणि 48 काडतूसं जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय.

दोन वर्षापासून सुरू होता व्यवसाय

या आरोपींमधील फिरोज खान याच्यावर नागपुरात तर  इम्रान आलम यावर बेळाघाट येथे गुन्हा दाखल झालाय. फिरोज खान आणि इम्रान आलम हे दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक  पिस्तूल विक्रीचे व्यवहार केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे या आरोपींची चौकशी केली असता अनेक खुलासे पोलिसांना झाले. पोलिसांनी जेव्हा या आरोपींचे मोबाईल जप्त केले त्यावेळी गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 

या प्रकरणी तपासाचे धागेदोरे पुढे गेल्यावर आणखी 5 पिस्तूलं आणि 48 जिवंत काडतूसं जप्त करण्यात पोलिसांना पुन्हा यश आले. दरम्यान या घटनांमुळे नागपुरात आणखी किती प्रमाणावर शस्रपुरवठा केला जात आहे, याचा तपास सध्या पोलीसांकडून घेण्यात येतोय. तर यामध्ये आणखी कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

हेही वाचा : 

Nanded Crime: बुलेटवरून चोरी करायचे, वाहन बदलून पसार व्हायचे; बुटावरून काढला माग आणि चोरांच्या मुसक्या आवळल्या

[ad_2]

Related posts