Supriya Sule Statement About Personal And Political Relations Of Pawar Family

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : राजकीय मतभेद असले तरी आम्ही (Political News) वैयक्तिक संबंध जपून असतो, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) पवारांची दिवाळी एकत्र साजरी होणार असल्याची माहिती दिली आहे. आज राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही ही पहिलीच दिवाळी पवार कुटुंब एकत्र साजरी करत आहेत. याच दिवाळी निमित्त आज पुण्यात प्रतापराव पवार यांच्या बाणेरच्या निवासस्थानी पवारांसाठी खास खोटेखाणी दावत आयोजित करण्यात आली. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दरवर्षी पवार कुटुंब बारामतीमध्ये एकत्र येत असते.प्रताप पवारांच्या पत्नी आमच्या काकी आजारी आहेत. त्यामुळं त्या यावर्षी येवू शकणार नाहीत. म्हणून आम्ही सगळे आज पुण्यात दिवाळीसाठी एकत्र आलो. दरवर्षी प्रमाणे यंदा आमचा पाडवा, भाऊबीज एकत्र होणार आहे आम्ही सगळे सणासाठी एकत्र येवू. आजित पवारांना कितपत शक्य होईल माहिती नाही.

 

राजकीय मतभेद असले तरी आम्ही वैयक्तिक संबंध जपू…

राष्ट्रावादीत फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये दुरावा आल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे यंदा पवार कुटुंब दिवाळी कशी साजरी करणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. मात्र सुप्रिया सुळेंनी दिवाळी एकत्र होणार असल्याचं म्हटलं आहे. सोबतच राजकीय मतभेद असले तरी आम्ही वैयक्तिक संबंध जपून असतो. एकमेकांच्या घरी जातो, एकमेकांना भेटतो. प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यात फरक असतो, असंही त्या म्हणाल्या. 

अजित पवारांना आरामाची गरज …

अजित पवारांना डेंग्यू झाला होता. दादांची तब्येत अजूनही पूर्णपणे बरी नाही. पोस्ट डेंग्यू लक्षणं आहेत. त्यांनी काळजी घ्यायला हवी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. प्रतापराव पवारांच्या घरातील दावत आटपून अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र त्यासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. मात्र अजित पवार जर दिल्लीला गेले असतील तर त्यांनी काळजी घ्यायला हवी. कारण दिल्लीतील हवा प्रचंड खराब झाली आहे तिथे प्रदुषणदेखील भरपूर प्रमाणात आहे. त्यातच आजारातून उठल्यामुळे त्यांनी दिल्लीत काळजी घ्यावी, असा सल्ला सुप्रिया सुळेंनी अजित पवारांनी दिला आहे. त्यासोबतच दिल्लीकरांनीदेखील काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Dilip Walse Patil : अंतिम शब्द शरद पवारांचा की अजित पवारांचा, वळसे पाटील म्हणाले…

[ad_2]

Related posts