Maratha Reservation Government Delegation Manoj Jarange Hunger Strike Chhatrapati Sambhaji Nagar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ (Government Delegation) पाचव्या दिवशी देखील आले नाही. जरांगे यांना देण्यात आलेल्या वेळेनुसार आजचा सहावा दिवस असून, आज देखील शिष्टमंडळ येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे लेखी टाईम बॉन्ड देण्यासाठी येणाऱ्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे यांना फक्त तारीख पे तारीख दिली जात असल्याचे चित्र आहे. 

दुसऱ्या टप्प्यात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्याकडे पुन्हा एकदा सरकारने 24 डिसेंबरपर्यंत वेळ मागितला आणि जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र, 24 डिसेंबरपर्यंत वेळ देणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारसोबत झालेल्या चर्चेची आणि ठरलेल्या गोष्टीचं लेखी टाईम बॉन्ड करून देण्याची मागणी केली. सरकारने देखील ते मान्य केलं होतं. मात्र, आता टाईम बॉन्ड देण्यासाठी शिष्टमंडळ येणार असल्याचे सांगत सरकारकडून मनोज जरांगे यांना तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे आता सरकारने देखील वेळ काढूपणा न करता शिष्टमंडळ पाठवून टाईम बॉन्ड देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. 

सही करण्यास मंत्री तयार नाही? 

मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केल्यावर सरकारने 24 डिसेंबरपर्यंत वेळ मागितला. तसेच, यावेळी जरांगे यांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका यावर चर्चा झाली. यावेळी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी नेमकं काय काय केलं जाणार याबाबत दोघांमध्ये एकमत झाले. मात्र, जरांगे यांनी ठरलेल्या सर्व गोष्टी आपल्याला लेखी स्वरूपात आणि 24 डिसेंबरच्या आता होणार असल्याचे टाईम बॉन्डची मागणी केली. सरकारने ते मान्य केले. तसेच 6 नोव्हेंबरला हे टाईम बॉन्ड देण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार होते. मात्र, सहा दिवस उलटले असतांना अजूनही हे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला आले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या टाईम बॉन्डवर सही करण्यास कोणतेही मंत्री पुढे येत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे यावर तोडगा निघत नसल्याचे बोलले जात आहे. 

अन्यथा जड जाईल, जरांगेंचा इशारा…

दरम्यान, यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया आली आहे. फक्त सहीमुळे टाईम बॉन्डसाठी वेळकाढूपणा सुरु असेल तर हे सरकारला जड जाईल. आमच्या भेटीला अनेक मंत्री आले, आश्वासन आणि शब्द देऊन गेले. मग आता ते सही का करत नाही. त्यांच्या हातात ताकद नाही का? असे जरांगे म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange : आमचं वाटोळं कोण करतंय, ‘त्या’ सहा जणांची नावं 24 तारखेला सांगतो; मनोज जरांगे पाटलांचा इशारा कुणाला? 

[ad_2]

Related posts