Eknath Khadse Calls CM Eknath Shinde After Heart Attack Said Thanks To Him Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका आला. खडसे यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)  तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली. त्यानंतर खडसे यांना उपचारासाठी जळगावहून मुंबईला दाखल करण्यात  आले . आता खडसे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दूरध्वनीवरून (Eknath Khadse Call CM Eknath Shinde)  संपर्क साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. तुमचं विमान वेळेवर टेक ऑफ झाले नसतं तर माझ्या आयुष्याच विमान लँड झालं नसतं, असे म्हणत  एकनाथ  खडसे यांनी मुख्यमंत्र्याचे आभार मानले. 

एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून घडलेला प्रसंग सांगितला. एकनाथ खडसे  म्हणाले, आपण वेळेवर मदतीला धावून आला. एअर ॲम्बुलन्स पाठवल्याबद्दल मनःपूर्वक आभार, आपलं विमान जर वेळेवर आला नसतं तर आमच्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं. 

शस्त्रक्रियेदरम्यान खडसे यांना हृदयविकाराचा झटका

 मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी  खडसे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत तब्येतीची काळजी घेण्याचे  आवाहन केले.  तसेच दिवाळीच्या देखील शुभेच्छा दिल्या.  मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नेते खडसे यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पार पडली . अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेदरम्यान खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला होता.  डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट देऊन बंद पडलेल हृदय पुन्हा सुरू केले.

एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था

एकनाथ खडसे यांना  हृदयविकाराचा झटका आला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातऱ्यातील त्यांच्या दरे या गावी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली. त्यानंतक राज्याचे मुख्यमंत्री  शिंदे यांना याबाबत फोन येताच त्यांनी एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.  एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला होता.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली. खडसे यांना उपचारासाठी जळगावहून मुंबईला दाखल करण्यात  आले.  

 एकनाथ खडसेंच्या प्रकृतीत सुधारणा

एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.  एकनाथ खडसे यांनी स्वत: ट्वीट करत तब्येत चांगली असल्याची माहिती दिली. एकनाथ खडसे म्हणाले,  मला हृदयविकाराचा त्रास झाला.  आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद 

नेमकं काय म्हणाले खडसे?

[ad_2]

Related posts