नाना काटे सोशल फाउंडेशनतर्फे दहावी, बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मा. नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त नाना काटे सोशल फाउंडेशन व नगरसेविका शितल काटे यांच्या संयुक्त विद्यमाने रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील 10 वी व 12 वी परिक्षेतील ५६५ उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, मा. नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शीतल नाना काटे, स्वाती उर्फ माई काटे, मायाताई बारणे, माजी नगरसेवक शंकर काटे, स्वीकृत नगरसेवक गोरक्षनाथ पाषाणकर, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, मा. नगरसेवक राजेंद्र साळुंखे, सतीश दरेकर, हरिभाऊ तिकोणे, युवा नेते श्याम जगताप, नवनाथ नढे, विवेक वेलणकर, प्रशांत सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता कोकणे, सागर कोकणे, भाऊसाहेब लांडे, महापालिका शाळेचे मुख्याध्यापिका प्रा. सुरेखा जोशी, उद्योजक प्रदीप तापकीर, भोयार सर यांच्यासह परिसरातील अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना १०वी १२ नंतर काय करावे याबाबत करियर मार्गदर्शन करण्यात आले.नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त रहाटणी- पिंपळे सौदागर प्रभागासाठी दहावी व बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करून किमान ९५ टक्के पुढील रेसर सायकल, ९० ते ९५ दरम्यान विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच आणि ७० ते ९० टक्के गुण मिळवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला बॅग भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी करियर मार्गदर्शक विवेक वेलणकर (प्रख्यात करिअर समुपदेशक) यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. नगरसेविका शीतल नाना काटे यांनी केले. तसेच कोविड काळातही ऑनलाइन अभ्यासक्रम असतानाही अनेक विद्यार्थ्यानी अधिकाधिक गुण मिळविल्याबद्दल अभिनंदन केले.नाना काटे म्हणाले, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करताना केवळ सत्कार न करता पुढील वाटचालीस दिशा मिळावी यासाठी विवेक वेलणकर यांचे मार्गदर्शन करण्याचे नियोजन केले. तसेच परिसरात ९५ टक्याहून अधिक गुण मिळवलेले ७५ विद्यार्थी, ९० ते ९५ टक्के १०५ विद्यार्थी आणि उर्वरित ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले असे एकूण ५६५ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. तर कोविड काळात ऑनलाईन शिक्षण घेताना शिक्षक समक्ष भेटले नाहीत. मात्र घरातील आई वडील यांनी मुलाचे शिक्षकाची भूमिका घेत मुलांनी एवढ्या मोठ्या टक्के मिळविण्यात मोलाचा वाटा उचलला म्हणून पालकांचा विशेष आभार व्यक्त केले.

Related posts