Majha Katta Abp Majha IPS Manoj Kumar Sharma And IRS Shraddha Sharma Journey Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : सध्याच्या स्पर्धा परीक्षांच्या युगामध्ये ‘माझा कट्ट्या’वरची (Majha Katta) शर्मा दाम्पत्याची मुलाखत ही फार खास ठरली. कुठलाही माणूस हा जन्मत: हुशार नसतो, अनुभवानुसार ती हुशारी माणसाकडे येते, असं तत्त्व घेऊन मनोज शर्मा यांनी त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात केली. IPS मनोज कुमार शर्मा (Manoj Sharma) आणि त्यांची पत्नी IRS श्रद्धा शर्मा (Shraddha Sharma) यांच्या सोबतीच्या प्रवासातील अनेक अनुभव त्यांनी माझा कट्ट्यावर सांगितले.

IPS मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर ट्वेवल्थ फेल हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यांची पत्नी श्रद्धा शर्मा (Shraddha Sharma) यांनी देखील त्यांना त्यांच्या या प्रवासात मोलाची साथ दिली.  जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा चित्रपट मोलाचा ठरला.बारावीत नापास झाले तरीही मनोज शर्मा यांनी जिद्द सोडली नाही. आजचं माहित नसलं तरीही भविष्य उज्वलंच करण्याचा अट्टाहास कोणालाही लाजवेल असा आहे.  मनोज शर्मा यांनी ‘माझा कट्ट्या’वर (Majha Katta) दिलखुलास गप्पा मारल्या. तसेच त्यांच्या प्रेरणादायी प्रवासामुळे अनेकांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला. 

माझा पहिला वाढदिवस हा श्रद्धाने साजरा केला. तिने घरामध्ये केक बनवला होता आणि तिने तो केक माझ्यासाठी आणला. त्यावेळी मला कळालं की, तिच्याही मनात काहीतरी आहे आणि इथूनच आमच्या प्रवासाला सुरुवात झाली, असं मनोज शर्मा यांनी माझा कट्ट्यावर सांगितलं.  

श्रद्धाने मला ‘तो’ विश्वास दिला – IPS मनोज कुमार शर्मा

पूर्व परीक्षेनंतर मनोज शर्मा यांनी मुख्य परीक्षेची तयारी सुरु केली. त्याआधी एका परीक्षेमध्ये त्यांना फार कमी गुण मिळले होते आणि मुख्य परीक्षेची देखील ती शेवटची संधी होती. त्यावेळी मनोज यांनी मानसिक अडचणींचा बराच सामना केली. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, माझा विश्वास ढासळत चालला आहे. त्यात मी 12 नापास. मी आता युपीएसी नाही करु शकत. काही दिवस मुख्य परीक्षेसाठी राहिले होते. तेव्हा श्रद्धाने मला सांगितलं की, अजिबात काळजी करु नका, तुमचा शिक्षकच चांगला नाही. तुम्ही खूप छान पेपर लिहिला आहे. तेव्हा मी दुसऱ्या शिक्षकाकडे गेलो. त्यांनी माझ्या पेपरचं कौतुकं केलं आणि माझा विश्वास वाढला. नंतर मला कळालं की श्रद्धानेच त्या शिक्षकांना तसं करायला सांगितलं होतं. 

‘आणि श्रद्धाने दागिन्यांचा त्याग केला…’

जेव्हा माझं सिलेक्शन झालं होते, तेव्हा मी श्रद्धाला सांगितलं की, आपल्याला प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे. तेव्हा श्रद्धाने मला सांगितलं मी काय करु शकते. मी तिला सांगितलं की दागिने हा मुलींच्या जरी फार जिव्हाळ्याचा विषय असला तरीही आपल्या पगारात आपल्याला ते नाही परवडू शकत आणि श्रद्धाने पटकन् म्हटलं की, ठिक आहे मी दागिने नाही घालणार. आता 22 वर्ष झाली पण श्रद्धाने माझ्याकडे एकही दागिना मागितला नाही. जर माणसाचं व्यक्तीमत्त्व चांगलं असेल तर त्याला दागिन्यांची काही गरज नाही. 

हेही वाचा : 

Majha Katta : मुलगा 12 वी नापास पण फुल कॉन्फिडन्स, उद्याचं माहिती नाही पण भविष्य चांगलं; IPS मनोज कुमार शर्मा आणि IRS श्रद्धा शर्मा यांचा प्रवास ‘माझा कट्ट्या’वर

[ad_2]

Related posts