Team India Diwali Celebration In Bengaluru India Vs Netherlands World Cup 2023 Team India Diwali Party

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Team India Diwali Celebration : सध्या सर्वत्र दिवाळीचा (Diwali 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. विश्वचषकात (World Cup 2023) व्यस्त टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंनीही (Indian Cricketers) व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत दिवाळी साजरी केली आहे. भारतीय संघातील खेळाडूंनी बंगळुरुमध्ये (Bengaluru) संघ कुटुंबियांसोबत मोठ्या दिमाखात दिवाळी साजरी केली, याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या (Team India) दिवाळी सेलिब्रेशनचे (Diwali Celebration) खास व्हिडीओही (Video) शेअर केला आहे.

टीम इंडियाचं दिवाळी सेलिब्रेशन

आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी भारताला वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्ससोबत शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकत्र दिवाळी साजरी केली. सर्व खेळाडू भारतीय ट्रेडिशनल लूकमध्ये दिसले. विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत तर रोहित शर्माही पत्नी आणि मुलीसोबत दिवाळी सेलिब्रेशन करताना दिसला. या खास दिवाळी सेलिब्रेशनमध्ये प्रशिक्षक राहुल द्रविडही सहभागी झाला. सोशल मीडियावर आलेले फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहतेही खूप खुश आहेत. 

टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ

आज भारत विरुद्ध नेदरलँड्स सामना

विश्वचषकाच्या (ODI World Cup 2023) रणांगणात भारताचा अखेरचा साखळी सामना आज नेदरलँड्सशी होतोय. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. भारतानं लागोपाठ आठ सामन्यांमध्ये विजय मिळवून विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान तर पटकावलंच, पण विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं पहिलं तिकीटही कन्फर्म केलंय. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणारंय. पण त्या नॉकआऊट सामन्याआधी भारतीय संघाला आणखी एका साखळी सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यात भारतासमोर नेदरलँड्सचं आव्हान आहे. वन डे क्रिकेटच्या दुनियेत नेदरलँड्स हा कच्चा लिंबू मानला जात असला तरी विश्वचषकाच्या साखळीत याच संघानं दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशसारख्या बलाढ्य संघांना हरवलंय, ते विसरता येणार नाही. त्यामुळं आठ सामन्यांमध्ये त्या दोन विजयांसह नेदरलँड्स गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. पण त्याच नेदरलँडविरुद्ध सामन्याचा आपल्या उणीवा दूर करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

 



[ad_2]

Related posts