Gangapur Farmers Protest To Demand Declaration Of Drought In Chhatrapati Sambhaji Nagar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : देशभरात आज मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरी केला जात असतानाच, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील एका गावात शेतकऱ्यांनी आमटी भाकर खाऊन काळी दिवाळी (Diwali) साजरी केली आहे. “सरकराने मोजक्याच महसूल मंडळात दुष्काळ (Drought) जाहीर केला आहे. त्यामुळे गंगापूर तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी (Farmers) आमटी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी केली आहे.”

मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक गावात पाणीटंचाई जाणवत आहे. तर काही ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीत सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात होती. मात्र, सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर न करता, प्रत्येक तालुक्यातील काही मोजक्या महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केल्याचा आरोप होत आहे. त्याचप्रमाणे संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील एकूण 12 मंडळापैकी 8 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, चार महसूल मंडळ दुष्काळातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी आज सरकारचा निषेध करत आंदोलन केलं.

संपूर्ण गंगापूर तालुक्यात यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना बारापैकी आठच महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यामुळे उरलेल्या चार महसूल मंडळामध्ये देखील दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. यासाठी आज वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी हटके आंदोलन केलं. एका कापसाच्या शेतात शेतकऱ्यांनी जेवणाची पंगत भरवली. दिवाळी सारखा गोडधोड खाण्याचा सण असताना, या शेतकऱ्यांनी आमटी आणि भाकर खाऊन सरकारचा निषेध केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, यावेळी गंगापूर तालुक्यातील उरलेल्या चार महसूल मंडळात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली.

मंत्री सत्तारांच्या मुलानेही काढला मोर्चा…

फक्त गंगापूरच नाही तर सिल्लोड तालुक्यातील शेतकरी देखील दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आक्रमक होतांना पाहायला मिळाले. सिल्लोड तालुक्यातील आठ पैकी सात महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र संपूर्ण सिल्लोड तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे याच मागणीसाठी मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांनी सिल्लोड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. तर तिकडे पैठण तालुक्यात देखील शेतकऱ्यांनी मोर्चा काढत तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

वडील सत्तेत मंत्री, पण मुलाने काढला सरकार विरोधातच मोर्चा; ‘अजब आंदोलनाची गजब कहाणी’

[ad_2]

Related posts