Virat Kohli Bowling Odi World Cup The Celebration Of Virat Kohli And Anushka Sharma

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli Bowling : यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीने दुसऱ्यांदा गोलंदाजी केली. सिराजला दुखापत झाल्यानंतर विराट कोहलीने गोलंदाजीचा मोर्चा सांभाळला. कुलदीपच्या गोलंदाजीवर झेल घेण्याच्या प्रयत्नात सिराजच्या गळ्याला मार लागला. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. भारताकडे गोलंदाजाचे फक्त पाच पर्याय असल्यामुळे विराट कोहली याला गोलंदाजी करावी लागली. विराट कोहलीने तीन षटकात फक्त 13 धावा खर्च करत महत्वाची विकेट्स घेतली. विश्वचषकात भन्नाट फॉर्मात असलेल्या नेदरलँड्सच्या कर्णधाराला विराट कोहलीने माघारी झाडले. 

विराट कोहलीने नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याला बाद केले. विराट कोहलीची वनडेमधील ही पाचवी विकेट ठरली. विराट कोहलीने तब्बल सहा वर्षांनतर यंदा गोलंदाजी केली. याआधी पुण्यातही विराट कोहलीने गोलंदाजी केली होती. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर विराट कोहलीने उर्वरित षटक पुर्ण केले होते. त्यावेळी शार्दूल ठाकूर हा पर्याय होता. पण आज भारताकडे कोणताही पर्याय नाही. त्यामुळे विराट कोहलीला गोलंदाजी करावी लागली. कोहली गोलंदाजीला आल्यानंतर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. विराट कोहलीने विकेट घेत चाहत्यांना आणखी जल्लोष करण्याची संधी दिली. विराट कोहलीने विकेट घेतल्यानंतर स्टेडिअमध्ये असणाऱ्या अनुष्का शर्माचीही रिअॅक्शनही व्हायरल झाली आहे. 

विराट कोहलीने वनडेमध्ये 2017 मध्ये गोलंदाजी केली होती. त्यानंतर त्याने 2023 च्या विश्वचषकात गोलंदाजी केली. विराट कोहलीने वनडेमध्ये पाचवी विकेट घेतली. त्याशिवाय टी20 मध्येही विराट कोहलीच्या नावावर चार विकेट आहेत. विराट कोहलीच्या गोलंदाजीवर विकेट पडल्यानंतर चाहत्यांनी एकच जल्लोष केला होता. विराट कोहीलशिवाय युवा शुभमन गिल यानेही गोलंदाजी केली. सिराज याने फक्त चार षटके गोलंदाजी केली होती. त्यानंतर फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली. त्यामुळे उर्वरित सहा षटके विराट, सूर्या आणि गिल यांच्याकडून पुर्ण करण्यात येत आहेत. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने कुणाकुणाला बाद केले ?
स्कॉट एडवर्ड्स Edwards (2023)
ब्रेडन मॅक्युलम (2014)
क्विंटन डि कॉक (2013)
Craig Kieswetter (2011)
अॅलिस्टर कूक (2011)

सिराजला दुखापत – 

नेदरलँड्सच्या ओडियड (O’Dowd) याचा झेल सिराजकडून सुटला. पण झेल घेण्याच्या प्रयत्नात मोहम्मद सिराजला दुखापत झाली. कुलदीप यादवच्या चेंडूवर ओडियड याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत होता, सिराज चेंडूच्या खाली आला… झेल घेण्यासाठी सिराजने हात उंचावले. पण चेंडू त्याच्या हातातून सुटला तो थेट गळ्यावर लागला. चेंडूचा वेग जास्त असल्यामुळे सिराजच्या गळ्यावर जोरदार मार लागलेला असू शकतो, असा  अंदाज वर्तवला जातोय. सिराज सध्या मैदानाच्या बाहेर गेलाय. त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरु आहेत. त्याला थुंकी गिळतानाही त्रास होत असल्याचे समजतेय. सिराजची दुखापत गंभीर असल्यास भारताला मोठा धक्का बसू शकतो. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरोधात भिडणार आहे. या सामन्याआधी सिराजची दुखापत गंभीर असेल तर भारातला मोठा धक्का मानला जातोय. बुमराह, सिराज आणि शामी यांनी वेगवान माऱ्याची धुरा यशस्वीपणे संभाळली आहे. मोहम्मद सिराजने दुखापतीमुळे मैदान सोडल्यानंतर विराट कोहलीने गोलंदाजीचा मोर्चा सांभाळला. याआधीही हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर विराट कोहलीने गोलंदाजी केली होती. 

भारताचा 410 धावांचा डोंगर – 

भारतीय फलंदाजांनी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज फटक्यांची जणू दिवाळी साजरी केली. त्यामुळंच नेदरलँड्सविरुद्धच्या अखेरच्या विश्वचषक साखळी सामन्यात भारताला चार बाद 410 धावांचा डोंगर उभारता आला. या सामन्यात भारताच्या श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलनं झंझावाती शतकं साजरी केली. श्रेयस अय्यरनं 94 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 128 धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलनं 64 चेंडूंत 11 चौकार आणि चार षटकारांसह 102 धावांची खेळी केली. भारतीय फलंदाजांनी या सामन्यात नेदरलँड्सच्या दुबळ्या आक्रमणाचा पुरेपूर लाभ उठवला आणि धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. भारताच्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या पहिल्या तीन फलंदाजांनी या सामन्यात अर्धशतकं झळाकवली. रोहित शर्मानं 61, शुभमन गिलनं 51 आणि विराट कोहलीनं 51 धावांची खेळी केली.

[ad_2]

Related posts