ICC World Cup 2023 India Vs Netherlands Anushka Sharma Reaction After Virat Kohli Took The Wicket Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई  : यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीने (Virat Kohli) दुसऱ्यांदा गोलंदाजी केली. सिराजला दुखापत झाल्यानंतर विराट कोहलीने गोलंदाजीचा (Bowling) मोर्चा सांभाळला. विराट कोहलीने नेदरलँड्सचा (Netherlands) कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याला बाद केले. विराट कोहलीची वनडेमधील ही पाचवी विकेट ठरली. विराट कोहलीने नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याला बाद केले.  पण विराटने विकत घेतल्यानंतर सगळ्यांच्या नजरा खिळल्या त्या अनुष्का शर्मावर (Anushka Sharma). विराटने विकेट घेतल्यानंतरचा आनंद अनुष्काच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तिच्या याच प्रतिक्रियेची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

विराटने तब्बल सहा वर्षांनंतर गोलंदाजीची धुरा सांभाळली. पण अनुष्काच्या चेहऱ्यावरील आनंद देखील षचपटीने वाढला. विराटने विकेट घेतल्यानंतर बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रेक्षकांनी दंगा केला तर यामध्ये कॅमऱ्याच्या नजरा खिळल्या त्या अनुष्कावर. 

सहा वर्षांनंतर गोलंदाजीची धुरा सांभाळली

 विराट कोहलीने तब्बल सहा वर्षांनतर यंदा गोलंदाजी केली. याआधी पुण्यातही विराट कोहलीने गोलंदाजी केली होती. विराट कोहलीने वनडेमध्ये 2017 मध्ये गोलंदाजी केली होती. त्यानंतर त्याने 2023 च्या विश्वचषकात गोलंदाजी केली. विराट कोहलीने वनडेमध्ये पाचवी विकेट घेतली. त्याशिवाय टी20 मध्येही विराट कोहलीच्या नावावर चार विकेट आहेत. विराट कोहलीच्या गोलंदाजीवर विकेट पडल्यानंतर चाहत्यांनी एकच जल्लोष केला होता. विराट कोहीलशिवाय युवा शुभमन गिल यानेही गोलंदाजी केली. सिराज याने फक्त चार षटके गोलंदाजी केली होती. त्यानंतर फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली. त्यामुळे उर्वरित सहा षटके विराट आणि गिल यांच्याकडून पुर्ण करण्यात येत आहेत. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने कुणाकुणाला बाद केले ?

स्कॉट एडवर्ड्स Edwards (2023)
ब्रेडन मॅक्युलम (2014)
क्विंटन डि कॉक (2013)
Craig Kieswetter (2011)
अॅलिस्टर कूक (2011)

भारताचा 410 धावांचा डोंगर  

भारतीय फलंदाजांनी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज फटक्यांची जणू दिवाळी साजरी केली. त्यामुळंच नेदरलँड्सविरुद्धच्या अखेरच्या विश्वचषक साखळी सामन्यात भारताला चार बाद 410 धावांचा डोंगर उभारता आला. या सामन्यात भारताच्या श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलनं झंझावाती शतकं साजरी केली. श्रेयस अय्यरनं 94 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 128 धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलनं 64 चेंडूंत 11 चौकार आणि चार षटकारांसह 102 धावांची खेळी केली. भारतीय फलंदाजांनी या सामन्यात नेदरलँड्सच्या दुबळ्या आक्रमणाचा पुरेपूर लाभ उठवला आणि धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. भारताच्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या पहिल्या तीन फलंदाजांनी या सामन्यात अर्धशतकं झळाकवली. रोहित शर्मानं 61, शुभमन गिलनं 51 आणि विराट कोहलीनं 51 धावांची खेळी केली.

हेही वाचा : 

झेल घेण्याच्या नादात सिराजला दुखापत, गळ्याला लागला मार, मैदान सोडले, कोहलीने सांभाळली गोलंदाजीची धुरा



[ad_2]

Related posts