…तर साऱ्या जगाविरोधात युद्ध पुकारू! इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला करत हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर अद्यापही युद्ध सुरुच आहे. युद्धाची झळ सामान्य नागरिकांना बसत असून गाझा पट्टीवरील शेकडो सामान्य नागरिकांना नाहकपणे आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जगभरातून इस्रायलवर टीका होत असताना पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासचा पराभव करण्यासाठी आपण कटिबद्द असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसंच गरज पडली तर आपण जगाविरोधात उभे राहू असं वृत्त टाइम्स ऑफ इस्रायलने दिलं आहे. 

पंतप्रधान नेतान्याहू यांनी संरक्षणमंत्र्यांसह घेतलेल्या संयुक्त परिषदेत पाश्चिमात्य देशाच्या नेत्यांना तुम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन केलं आहे. हा विजय संपूर्ण जगाचा विजय असेल असं ते म्हणाले आहेत. टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर पॅलेस्टाइन प्रशासन पुन्हा गाझा पट्टीत परतलं तर आम्ही विरोध करु. 

इस्रायलकडून गाझा पट्टीवर हल्ले सुरु असून अनेक सामान्य नागरिकांच्या मृत्यूनंतर मानवतेच्या आधारे अनेक देश विरोध करत आहेत. शुक्रवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी गाझामधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसंच मदत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप काही करावं लागणार आहे. युद्धात अनेक पॅलेस्टाइन नागरिक ठार झाले असल्याचंही यावेळी त्यांनी मान्य केलं. 

नेतान्याहू यांनी युद्धविरामाच्या विरोधासाठी जगभरातून पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.  ज्यामध्ये पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी गाझामध्ये ठेवलेल्या शेकडो ओलीसांच्या परतीचा समावेश नाही. अमेरिकन लोकांसाठी धोका असणाऱ्या हमासचा नाश कऱण्याच्या मागणीत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. टाईम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, बहुतेक अमेरिकन लोकांना याची जाणीव असल्याचं ते म्हणाले आहेत. काही देशांमधील नेते युद्धविरामासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लंडनमध्ये शनिवारी एक मोठी रॅली काढण्यात आली होती. 

“आमच्यावर दबाव टाकू नका. आमचं युद्ध हे तुमचं युद्ध आहे. इस्रायलला आपल्या आणि जगाच्या भल्यासाठी जिंकावं लागणार आहे,” असं नेतान्याहू म्हणाले आहेत. गरज लागली तर उद्या आम्ही जगाविरोधात उभे राहू अशीही भूमिका त्यांनी मांडली. 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी इस्रायलकडून महिला, मुलं आणि वयस्कर नागरिकांवर बॉम्ब टाकले जात असल्याचं कोणतंही स्पष्टीकरण दिलं जाऊ शकत नाही अशी टीका केली आहे. त्यावर नेतान्याहू म्हणाले आहेत की, “त्यांनी वास्तविक आणि नैतिकदृष्ट्या गंभीर चूक केली आहे. इस्रायल नव्हे तर हमास आपल्या नागरिकांना तेथून बाहेर काढत नाही आहे”.

Related posts