Rohit Sharma Virat Kohli India Would Like To Avoid These 5 Mistakes Of 2019 Semi-Final Against New Zealand World Cup

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Semi-Final Against New Zealand World Cup : लागोपाठ नऊ सामन्यात बाजी मारत भारतीय संघाने थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय संघाला 15 नोव्हेबर रोजी न्यूझीलंडसोबत दोन हात करायचे आहेत. 2019 नंतर पुन्हा एकदा हे दोन संघ सेमीफायनलमध्ये आमनेसामने असतील. चार वर्षांपूर्वी न्यूझीलंडने भारताचा पराभव करत फायनलचे तिकिट मिळवले होते. त्याची परतफेड करण्याची संधी रोहित शर्मा अॅण्ड कंपनीकडे असेल. 2019 मध्ये झालेल्या पाच चुका या विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली टाळण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. 2019 मध्ये भारताकडून कोणत्या पाच चुका झाल्या होत्या, त्यामुळे सेमीफायनलमध्ये पराभव झाला.. त्याबाबत पाहूयातत…

अतिआत्मविश्वास नकोच – 

2019 च्या विश्वचषकात भारताच्या टॉप ऑर्डर फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली होती. पण उपांत्य सामन्यात स्वप्न चक्काचूर झाले. टॉप ऑर्डर फ्लॉप गेल्यानंतर मिडल ऑर्डरलाही सावरता आले नाही. यावेळीही भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे, हेच रोहित शर्मा अॅण्ड कपंनीला लक्षात ठेवायचेय. आत्मविश्वास असायला हवा पण अतिआत्मविश्वास नको. भारतीय संघ अतिआत्मविश्वासात गेला नाही तर न्यूझीलंडचा पराभव नक्कीच होईल. 

टॉप ऑर्डर फेल झाली तर…

2019 च्या विश्वचषकात भारतीय संघाची आघाडीची फळी ध्वस्त झाली होती. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल अवघ्या पाच धावांवर तंबूत परतले होते. इतकेच नाही तर 24 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर 71 धावांत अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर भारतीय संघात खळबळ माजली होती. त्यात पाऊस आल्यामुळे भारतीय संघाला अधीक फटका बसला. रवींद्र जाडेजा आणि धोनीमुळे टीम इंडियाने 221 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाने 2019 मध्ये एकापाठोपाठ विकेट फेकल्या होत्या. हीच चूक आता केली तर महागत पडू शकेल. भारतीय संघाने भागिदारीवर लक्ष केंद्रीत करावे. सध्या भारतीय संघ सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करतोय, न्यूझीलंडविरोधातही अशीच कामगिरीची अपेक्षा आहे.

गोलंदाजांना 150 टक्के द्यावे लागेल….

2019 च्या विश्वचषकात भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 239 धावांत रोखले होते. गतवेळपेक्षा यंदाची गोलंदाजी अधिक सरस दिसत आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज या वेगवान माऱ्याला कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा यांची साथ आहे. या पाच प्रमुख गोलंदाजांना 150 टक्के द्यावे लागणार आहे. न्यझीलंडला ठरवीक अंतराने धक्के द्यावे लागणार आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय माऱ्यापुढे प्रतिस्पर्धी संघाला 273 पेक्षा जास्त धावा करताच आल्या नाहीत. सेमीफायनलमध्येही टीम इंडियाला धमाकेदार कामगिरी करावी लागणार आहे. 

कुलदीप-जड्डू ती चूक करणार नाहीत, गोलंदाजीचा सहावा पर्याय

आतापर्यंत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली आहे. 2019 मध्येही भेदक मारा केला होता. मार्टिन गुप्टिल याला धक्का देत शानदार सुरुवात केली. पण चहल याला न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखता आले नाही. चहलन 10 षटकात 63 धावा खर्च केल्या होत्या. त्याशिवाय हार्दिक पांड्यानेही 55 धावा दिल्या होत्या. अशा स्थितीत भारताने गोलंदाजीचा सहावा पर्याय ठेवायला हवा. भारताच्या प्लॅनमध्ये तो दिसलाही… विराट, गिल, सूर्या आणि रोहित यांनी नेदरलँड्सविरोधात गोलंदाजी केली.

गोंधळ टाळा, योग्य निर्णय घ्या… 
2019 प्रमाणे यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने गोंधळ टाळायला हवा. 2019 मध्ये एमएस धोनीच्या फलंदाजी क्रमवारीत गोंधळ दिसला होता. सध्या भारतीय संघ  विनिंग कॉम्बिनेशनसह उतरत आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माने अचंबित करणारा निर्णय घेऊ नये. ज्या प्रमाणे साखळी सामन्यात प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली, तशीच सेमीफायनलमध्येही पाडावी. कुणाच्याही क्रमवारीत बदल टाळावा. 

[ad_2]

Related posts