Hallabol Procession In Sachkhand Gurdwara Of Nanded On Occasion Of Diwali

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नांदेड: शहरात दरवर्षीप्रमाणे दिवाळी (Diwali) सणाच्या निम्मीताने शीख बांधवांकडून प्रतिकात्मक हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आलीय. या मिरवणूकीत लहान थोरासह सगळेच जण मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. गुरु गोवींदसिंघजी महाराज यांनी बैसाखीच्या दिवशी लढाऊ “खालसा धर्माची” स्थापना केली होती. त्यामुळे, शिख धर्मीयातील लढाऊ बाणा टिकुन रहावा यासाठी हा प्रतीकात्मक हल्लाबोल मिरवणूक काढण्याची प्राचीन परंपरा आहे. या मिरवणूकीत शिख धर्मीय शस्त्र घेऊन वाईटावर हल्ला करण्यासाठी कायम सज्ज असल्याचे दाखऊन देतात. आजच्या हल्लाबोल मिरवणूकीत तरुणाची संख्या लक्षणीय होती. विशेष म्हणजे, नांदेड़ इथल्या गुरुद्वारात दिवाळीच्या सणात निघणाऱ्या हल्लाबोल मिरवणूकीत सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिख भावीक नांदेडला आलेले आहेत.

नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात आज सायंकाळी दिपावली सणानिमित्त हल्लाबोल कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. शिख बांधवांच्या वर्षेभरातील प्रमुख व ऐतिहासिक सणांपैकी हा प्रमुख सण आहे. जगभरातील शिख समुदायाचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंह यांनी सुरु केलेल्या या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. या सणात सहभागी होण्यासाठी देशविदेशातील शिख बांधव नांदेडात येतात. दरम्यान, दिवाळी सणानिमित्त हल्लाबोल चौका पासून सचखंड गुरुद्वारापर्यंत शहरातील प्रमुख भागातून हल्लाबोल कार्यक्रम करण्यात आलाय. यावेळी हजारो शिख बांधवांनी मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळत आहे. 

मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा

नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा करण्यात आला आहे. लक्ष्मीपूजनानंतर फोडलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने अख्खे नांदेड शहर उजळून निघाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी पहिले पाणी म्हणजेच नरक चतुदर्शी निमित्त सुगंधी उटणं लावून अभ्यंगस्नान आणि त्यानंतर भल्या पहाटे फटाके फोडून नांदेडकरांची दिवाळीची सुरुवात केली. तदनंतर रविवारी दिवसभर बाजारापेठा ग्राहकांनी गजबजलेल्या पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. बऱ्याच दिवसांनी नांदेडकरांनी मोठ्या प्रमाणात दिवाळीचा आनंद साजरा केला असल्याचे बोलले जात आहे. 

बंदाघाटावर दिवाळी पहाटची मेजवानी

दरम्यान, जिल्हा प्रशासन, नांदेड गुरुद्वारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती, नांदेड यांच्या वतीने नांदेडच्या गोदातीरावर बंदाघाट येथे आजपासून ‘दिवाळी पहाट’ला प्रारंभ झाला. रविवारी ‘भक्तीचा भावघाट या कार्यक्रमात सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांनी रसिक चिंब झाले. पहाटेच्या थंडीतही बंदाघाटावर नांदेडकर रसिकांनी तुडुंब गर्दी केली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nanded : श्रीरामाच्या दर्शनासाठी नांदेड ते अयोध्या पायी प्रवास, किनवटच्या ध्येयवेड्या तरूणाचा प्रवास

[ad_2]

Related posts