Maharashtra Opposition Leader Vijay Wadettiwar Criticize To NCP Leader And Deputy Chief Minister Ajit Pawar On Fund Allocation Issue To NCP Mla

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर :  महाविकास आघाडीत ( Maha Vikas Aghadi )असताना धाक दाखवून कधीकाळी तिजोरी साफ करणाऱ्या अजित दादांनी ( Ajit Pawar) तीच धमक आता दाखवावी. निधी मिळत नाही, म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत त्यांनी दाखवावी. तीन पक्षाच्या सरकारमध्ये त्यांना वाटते निधी मिळत नाही, अरे तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे, तरी निधीसाठी का रडता?  असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. अजित पवारांनी आता धमक दाखवावी असे म्हणताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणतात त्या प्रमाणे तुम्ही दिल्लीचे चरणदास झाले आहात असा बोचरा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. 

अजित दादा ( Ajit Pawar ) कधी खुश राहिले आहेत का?  ते नेहमीच नाराज असतात.मनाप्रमाणे झाले, तर खुश, मनाविरुद्ध झाले तर नाराज आणि हम करे सो कायदा, आम्ही हवं तसे वागू अशी त्यांची भूमिका आहे. महाविकास आघाडीमध्ये धाक दाखवून सर्व तिजोरी साफ करत होता. तीच धमक आता दादांनी दाखवावी. दिल्लीत त्यांनी तक्रारच केली. आता असं सांगू नका की तक्रार करता करता ते तिथे रडले सुद्धा. तक्रारी पुरताच दादांना मर्यादित ठेवा, आता रडण्याची स्थिती अजित पवारांवर आली असेल. भारतीय जनता पक्ष मध्ये जाणाऱ्यांना रडवून रडवून सोडवतात. त्यामुळे सडण्याची आणि रडण्याची वेळ अजित पवारांवर आली असावी असा टोला देखील विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. 

ओबीसी समाज विखुरलेले, म्हणुन दुर्लक्षित

ओबीसी(OBC ) समाज हा विखुरलेला आहे. तो एकत्र येऊ शकत नाही असा समज सरकारचा आहे. त्यामुळे सरकाराची कायम उदासीन भूमिका ओबीसी समाजाविषयी राहिली असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.  केवळ ओबीसीच्या मतांवर निवडून यायचे मात्र त्यांचे प्रश्न सोडवायचे नाही. असाच त्यांच्या मानस आहे. शिंदे सरकारने आजवर ओबीसींचे कोणतेही प्रश्न मार्गी लावलेले नाही. अशी प्रतिक्रिया ओबीसी समाज विषयी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी दिली.

लोंढे यांच्या बॅनरबाबत प्रदेशाध्यक्षांना माहीत…

काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात झळकलेले बॅनर विषयी अधिक विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, याबद्दल अतुल लोंढे आणि प्रदेशाध्यक्ष यांना माहिती असावी. दोघांनी काही ठरवलं असेल तर त्याबद्दल त्यांना विचारला पाहिजे. मात्र आमच्या कानावर अशी कोणती माहिती नाही आणि उमेदवारी देण्याचा सध्या प्रश्न नाही. बॅनर लावले म्हणून निवडणूक लढवणार असं नाही. फक्त दिवाळीच्या शुभेच्छाचे ही बॅनर असू शकतात. अतुल लोंढे प्रदेशचे मुख्य प्रवक्ते असल्यामुळे प्रदेश अध्यक्षांना त्या संदर्भात माहीत असेल असे त्यांनी म्हटले. 

[ad_2]

Related posts