Ind Vs Nz Team India Will Be Nervous In Front Of New Zealand Ross Taylor Reminded Of 2019 World Cup Semi Final World Cup 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs New Zealand Semifinal : विश्वचषकाच्या साखळी सामन्यात टीम इंडियापुढे सर्वच संघाने नांगी टाकली. भारताने नऊ सामन्यात विजय मिळवत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. 15 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ न्यूझीलंडविरोधात वानखेडेत भिडणार आहे. विजेतेपदापासून अवघ्या दोन पावले दूर असलेल्या रोहित ब्रिगेडचा सामना आता न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्याने सर्वांना 2019 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीची आठवण करून दिली आहे. भारतीय संघ त्या पराभवाचा वचपा काढेल, अशीच चाहत्यांना आशा आहे.  मात्र याचदरम्यान माजी किवी कर्णधार रॉस टेलरने मोठे वक्तव्य केले आहे.

 रॉस टेलरच्या मते, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना करताना भारतीय संघ नर्व्हस होईल. चार वर्षांपूर्वी  पावसाने प्रभावित झालेल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यावेळीही टीम इंडिया अव्वल स्थानावर होता. पण न्यूझीलंडने 2019 च्या विश्वचषकात भारताचे वर्चस्व संपवले होते.

2019 च्या विश्वचषकाप्रमाणेच यावेळीही भारताने लीग टप्प्यात अव्वल स्थान पटकावून उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेत चांगली सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडने साखळी फेरीत 9 सामन्यांत पाच विजयांसह 10 गुणांसह चौथ्या स्थानावर राहून उपांत्य फेरी गाठली आहे. या दोन्ही संघाचा उपांत्य फेरीत सामना होणार आहे.  2019 मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सदस्य असलेल्या रॉस टेलर यावेळीही भारत नर्वस होईल, असे वक्तव्य केलेय. टेलर म्हणाला की, ‘न्यूझीलंड उपांत्य फेरीत भारताचा सामना करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत  2019 शी तुलना करणे अशक्य आहे. चार वर्षांपूर्वी, भारताने स्पर्धेतील सर्वात फॉर्ममध्ये असलेला संघ म्हणून उपांत्य फेरी गाठली होती. तर आम्ही आमच्या निव्वळ धावगतीच्या आधारावर पाकिस्तानला शेवटच्या चार स्थानांपासून दूर ठेवण्यावर अधिक केंद्रित केले होते. यावेळी भारताची ताकद आणखी जास्त दिसतेय. ते घरच्या मैदानावर खेळत आहेत आणि लीग टप्प्यात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे, परंतु जेव्हा गमावण्यासारखे काही नसते तेव्हा न्यूझीलंड संघ धोकादायक बनतो. भारत कोणत्याही संघाचा सामना करण्यास घाबरत असेल तर तो न्यूझीलंड संघ आहे. न्यूझीलंडविरोधात खेळताना भारतीय संघ नर्वस होईल. ‘

यंदाच्या विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये आमच्यासमोर खडतर आव्हान आहे, पण 2019 मध्येही तेच होते. 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे दोन दिवस झाला होता. माझ्यासाठी ही विचित्र परिस्थिती होती. अगदी कसोटी क्रिकेटमध्येही हे खूपच त्रासदायक आहे, एकदिवसीय आणि विश्वचषकाची उपांत्य फेरी सोडा, असेही टेलर म्हणाला.

[ad_2]

Related posts