( प्रगत भारत । pragatbharat.com)
Rahu Ketu Gochar 2023: ज्योतिषशास्त्रामध्ये राहू आणि केतूला पापी आणि मायावी ग्रह मानलं जातं. शिवाय पौराणिक ग्रंथांमध्ये त्यांना अशुभ ग्रह देखील म्हणतात. राहू-केतू हे ग्रह नेहमी उल्टी म्हणजे वक्री चाल चालतात. ज्योतिष शास्त्रानुसा, ज्यावेळी हे राहू-केतू ग्रह त्यांची राशी बदलतात तेव्हा लोकांच्या जीवनात फारच उलथापालथ घडवून आणतात.
राहु आणि केतू हे दीड वर्ष एका राशीमध्ये गोचर करतात. या अशुभ ग्रहांचा राशी बदल ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. राहू-केतूच्या गोचरचा काही राशींवर नकारात्मक तर सकारात्मक प्रभाव पडताना दिसतो. सध्या राहू मेष राशीत तर केतू तूळ राशीत आहे.
राहू – केतूचं गोचर
येत्या 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहू – केतूचं गोचर होणार आहे. मात्र या गोचरमुळे 4 राशींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहे. तर काहींना नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना हा त्रास होऊ शकतो.
कन्या रास
केतू ग्रह 30 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याचा या राशींच्या व्यक्तींना मोठा फटका बसू शकतो. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यावर संयम ठेवावा लागू शकतो. या राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात अनेक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. शिवाय कौटुंबिक नात्यात मतभेद होऊ शकतात. तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहू शकतो.
वृषभ रास
राहू – केतू ( Rahu Ketu Gochar 2023 ) च्या गोचरमुळे या राशींच्या लोकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात देखील मोठ्या समस्या उभ्या राहू शकतात. घरामध्ये छोट्या कारणावरून मोठा वाद निर्माण होऊ शकतो. आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अनुकूल नसणार आहे.
मेष रास
राहू – केतूचं गोचर मेष राशीच्या लोकांसमोर आर्थिक समस्या उभ्या करणार आहे. या काळामध्ये तुम्ही गुंतवणुकीचा विचार करणार असाल तर हा विचार पुढे ढकलावा. गुंतवणूकीसाठी हा काळ चांगला नाहीये. घरामध्ये एखादा मोठा वाद होण्याची शक्यता आहे. या राशी बदलाचा प्रभाव वैवाहिक जीवनावरही पडणार आहे. नोकरी सोडण्याचा विचार करणं टाळलं पाहिजे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)