Sharad Pawar Diwali Padwa Meeting With NCP Workers At Katewadi Baramati Govind Baug House Will Ajit Pawar Meet Supriya Sule Maharashtra Politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बारामती, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Diwali) यांच्या बारामतीतील गोविंद बागेतील घरी दिवाळी पाडव्यानिमित्त (Diwali Padwa) गाठीभेटी होत आहे. शरद पवारांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते बारामतीत (Govind Baug Baramati) दाखल झाले आहेत. दरवर्षी पाडव्यानिमित्त शरद पवार कार्यकर्त्यांना भेटून शुभेच्छा देतात. या वर्षीही प्रकृती बरी नसली तरीही शरद पवार परंपरेप्रमाणे कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) फुटीनंतर गोविंद बागेत हा पहिलाच दिवाळी पाडवा होत आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहणार का याबाबतची उत्सुकता आहे. 

दरम्यान, आज सकाळपासूनच गोविंद बागेत लोक जमायला सुरुवात झाले. यावेळी पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त होता. सकाळी आठ वाजता शरद पवार, सुप्रिया सुळे हे शुभेच्छांचा स्वीकार करण्यास सुरुवात केली.  

आमदार अतुल बेनके पवारांच्या भेटीला 

दरम्यान, राज्यभरातून कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला येत असताना, अजित पवार समर्थक आमदारांनीही शरद पवारांची भेट घेतली. पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी शरद पवारांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. “माझे वडील पवार साहेबांना भेटायला येत होते. मी सुद्धा सगळ्यांना भेटायला आलो आहे. यातून राजकीय अर्थ काढू नये. सगळे एकत्र राहायला पाहिजेत”, असं अतुल बेनके म्हणाले.  

मी अजित पवारांनी भेटायला जाणार आहे. अजित पवार इथे असायला हवे होते. पुन्हा सगळे आपल्याला एकत्र दिसतील, असा विश्वासही अतुल बेनके यांनी व्यक्त केला.  

अजित पवार-शरद पवार जेवणासाठी एकत्र होते : मुश्रीफ 

अजित पवार आज गोविंद बागेत दिसत नसले तरी काल रात्री सर्व पवार कुटुंब एकत्र जेवणासाठी होते. शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र श्रीनिवास पवार यांच्या घरी जेवणासाठी होते, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना सांगितलं.  

रोहित पवार दिवाळीनिमित्त बीडच्या कार्यालयात

दरम्यान, तिकडे रोहित पवार यांनी दिवाळीनिमित्त बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय जमावाने पेटवून दिलं होतं. त्याच कार्यालयामध्ये रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत आणि इतर नेत्यांसोबत आज दिवाळी पाडवा साजरा करत आहेत.  पाडव्याच्या निमित्ताने एकीकडे बारामतीमध्ये दरवर्षी पाडव्याला अख्खं पवार कुटुंब एकत्र येत असतं, मात्र या पाडव्याला रोहित पवार हे कुटुंबासमवेत बीडमध्ये आहेत. 

VIDEO : अतुल बेनके नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या 

Mumbai : दिवाळीत फटाक्यांसोबत पोलिसांच्या ‘ट्रिंग ट्रिंग’चा आवाज, 5000 हून अधिक तक्रारीचे फोन  

[ad_2]

Related posts