Tech News News Launch Huawei Matepad Pro 11 Inch 2024 Tablet With Satellite Connectivity

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Huawei MatePad Pro 11-inch  : Huawei कंपनी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करत असतात. आता त्यांनी सॅटेलाईट कम्युनिकेशनला सपोर्ट करणारा नवा टॅब बाजारात येणार आहे.  Huawei MatePad Pro 11-inch मॉडेल बाजारात येणार  आहे. Huaweiच्या वेबसाईटवरील अधिकृत लिस्टिंगमध्ये हा टॅब्लेट चीनच्या Beidou सॅटेलाइट प्रॉडक्ट मॉडेलमध्ये डिस्प्ले केला आहे. सॅटेलाईट कम्युनिकेशनला सपोर्ट करणारा हा जगातील पहिला टॅब्लेट ठरला आहे. Huawei MatePad Pro 11-inch मॉडेल नेमका कसा आहे?, त्याचे फिचर्स काय आहेत? पाहुयात…

Huawei ने Huawei MatePad Pro 11 2024 मॉडेलमध्ये चीनच्या  Beidou सैटेलाइट कम्युनिकेशन सिस्टिमता वापर केला जाऊ शकतो. ही सिस्टिम वापरकर्त्यांना नेटवर्क कव्हरेज नसलेल्या भागातदेखली मेसेज पाठवण्याची सुविधा देते.  हुवावेच्या सॅटेलाईट कम्युनिकेशन सिस्टिममध्ये 36 हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या हाय ऑर्बिट सॅटेलाईटचा वापर करण्यात आला आहे. अतिरिक्त अँटेनाची आवश्यकता नसताना हुवावे हे करू शकणार आहे. त्याऐवजी कंपनी टॅब्लेट हाई-गेन एल्गोरिदम आणि नविन कम्युनिकेशन प्रोटोकॉल टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे. या टॅबची किंमत 59 हजारांपर्यंत आहे. 

हुवावेने वीज वापर आणि सिग्नल लॉस्ट संबंधित समस्यांवर मात केली आहे. या तंत्रज्ञानामुळे MatePad Pro 11 2024 मॉडेल हे  जगातील पहिले मॉडेल ठरणार आहे. यापूर्वी Huawei P60, Huawei P60 Pro, Mate 50 सीरीज, Mate X3, Mate X3 Pro, Mate Xs 2 और Nova 11 Ultra  सारख्या मॉडेल्सनी नव्या टेक्लॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. 

आयफोनला टक्कर देणारी Huawei Mate 60 series लॉंच

अॅपलच्या आयफोनची क्रेझ (Apple iphone) काय आहे हे सांगण्याची गरज नाही. अॅपलचे आयफोन जगभरात मोठ्या (Mobile Phone) प्रमाणात खरेदी केले जातात. मात्र मध्यंतरी एका चिनी स्मार्टफोनने देशांतर्गत बाजारपेठेत चांगलीच प्रसिद्धी मिळवली (Mobile Phone In budget) असून लोक त्याची जोरदार खरेदी करत आहेत. चीनमध्ये या फोनची विक्री आयफोनपेक्षा जास्त आहे. 9 to 5 mac च्या अहवालानुसार, ऑक्टोबरपासून काउंटरपॉईंटच्या सर्वेक्षणात Huaweiच्या (Huawei Mate 60 series) विक्रीत 83 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर अॅपलच्या विक्रीत केवळ 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता आयफोनपेक्षा Huawei ची क्रेझ वाढताना दिसत आहे. Huaweiने काही काळापूर्वी चीनमध्ये Huawei mate 60 सीरिज लाँच केली होती. या अंतर्गतHuawei mate 60 आणि Huawei mate 60 Pro सह 2 स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. लोक कंपनीचा  mate 60 स्मार्टफोन भरपूर खरेदी करत असून त्याने आयफोनलाही मागे टाकले आहे.

इतर महत्वाची बातमी-

Airtel Recharge :मोबाईल रिचार्जवर फ्री Netflix सब्सक्रिप्शन; Airtel कडून पहिल्यांदाच ऑफर, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन…

[ad_2]

Related posts