मुंबईसाठी यलो अलर्ट, ठाणे आणि पालघरलाही इशारा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई, ठाणे आणि परिसरात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उद्यापासून परवा म्हणजेच २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मुंबई महानगराच्या काही भागात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

अवकाळी पावसामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळणार नसला तरी त्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा आहे.

मुंबईत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. यापूर्वी ८ आणि ९ नोव्हेंबरलाही येथे अवकाळी पाऊस झाला होता. 

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाण्यातील पालघर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस किनारी भागातून पुढे जाण्याची शक्यता आहे. तीन दिवसांपूर्वी उपनगरातील किमान तापमान 21 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते, मात्र मंगळवारी त्यात वाढ झाली.

मात्र 24 नोव्हेंबरपासून मुंबईच्या आकाशात ढग जमा होऊ शकतात. त्यानंतर 25 तारखेला दुपार किंवा सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २६ तारखेलाही पावसाची शक्यता आहे.

आज पावसाचा अंदाज कुठे आहे?

आजपासून महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात जोरदार वारा, विजांचा कडकडाट आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचा

यंदा पाणीपट्टीत वाढ न झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा


हिवाळ्यात पावसाळा, राज्यात कोसळणार पाऊस

[ad_2]

Related posts